विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात काल ओबीसी महासंघाच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अजितदादांनी छगन भुजबळ यांना दणका दिला. कारण भुजबळ शिंदे – फडणवीस सरकार मध्ये राहून राहुल गांधींचा अजेंडा चालवत असल्याचे त्यांना दिसले!! Chagan bhujbal pursuing rahul gandhi’s agenda on obc issue
तर काय आहे सध्याचा राहुल गांधींचा अजेंडा??… तर तो आहे, हिंदुत्वाचा फॉर्मुला देशभर यशस्वी चालल्यानंतर हिंदूंमध्ये जाती अंतर्गत फूट वाढवून ओबीसी राजकारण करण्याचा राहुल गांधींचा अजेंडा आहे. म्हणूनच राहुल गांधी वारंवार केंद्र सरकार फक्त 90 अधिकारी चालवतात आणि त्यातले फक्त 3 ओबीसी आहेत. त्यांच्या खात्यांचे बजेट फक्त 5 % टक्के आहे, असा आरोप करतात आज छत्तीसगड मध्ये राहुल गांधींनी तोच आरोप रिपीट केला. त्याचवेळी त्यांनी ओबीसी जनगणना हाच देशात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असल्याचा दावा केला.
नेमका हाच और विषय काल छगन भुजबळ यांनी सह्याद्री मधल्या बैठकीत मांडला!! राज्यात ओबीसी सचिव किती हा विषय चर्चेला आल्यानंतर भुजबळांनी काही आकडेवारी सादर केली आणि त्यावर अजित पवारांनी ती आकडेवारी खोटी असल्याचे स्पष्ट त्यांना स्पष्ट शब्दांत ठणकावले. त्यामुळे अजितदादा आणि भुजबळ यांच्यात खडाजंगी झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या.
मात्र या बातम्या संदर्भात खुलासा करताना भुजबळांनी आजही आपला तोच मुद्दा लावून धरला. आपण गायकवाड आयोग असल्या आकडेवारीनुसार कालच्या बैठकीत माहिती दिली आणि थोडे मोठ्या आवाजात बोललो. पण माध्यमांनी त्यातून पराचा कावळा केला, असे भुजबळ म्हणाले.
अधिकाऱ्यांना पैसे देऊन 28 लाख मराठा यांनी स्वतःची ओबीसी नोंदणी केली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्या आरोपांना देखील भुजबळांनी दुजोराच दिला. त्यासाठी त्यांनी पुण्यातले उदाहरण दिले. पुण्यात काही नगरसेवकांनी पैसे देऊन आपली नोंद ओबीसी केली आणि निवडून आले. त्यांना कोर्टात जावे लागले. पैसे घेऊन कुणी चुकीचे प्रमाणपत्र देत असेल, तर अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात कारवाई केली पाहिजे, असे छगन भुजबळ म्हणाले.
पण याचा अर्थ असाच, की भुजबळांनी आजही आपला मुद्दा सोडलेला नाही. उलट आपल्या कालच्या म्हणण्याच्या पुष्टीसाठी त्यांनी गायकवाड आयोगाच्या अहवालाचा हवाला दिला. त्यातल्या आकडेवारीचा संदर्भ सांगितला. म्हणजेच छगन भुजबळ शिंदे – फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राहून राहुल गांधींचा ओबीसी अजेंडा चालवत आहेत आणि हे अजितदादांच्या लक्षात आल्यामुळेच काल त्यांनी भुजबळांना दणका दिला. पण आजही भुजबळांची भूमिका बदललेली नाही. कालचीच भूमिका कायम आहे, हे भुजबळांच्या आजच्या खुलाशावरून स्पष्ट झाले. आता हे पाहून अजितदादा यापुढे नेमकी काय कार्यवाही करणार??, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
Chagan bhujbal pursuing rahul gandhi’s agenda on obc issue
महत्वाच्या बातम्या
- महिला आरक्षण विधेयकाचा झाला कायदा, राष्ट्रपतींची स्वाक्षरी; राजपत्रित अधिसूचनाही जारी
- केजरीवाल म्हणाले- आप इंडियासाठी कटिबद्ध, आम्ही वेगळे होणार नाही, पंजाबमधील काँग्रेस आमदाराची अटक ही कायदेशीर बाब!
- इस्कॉनची मनेका गांधींना 100 कोटींची मानहानीची नोटीस; म्हटले- इस्कॉनचे भक्त आणि हितचिंतक आरोपांमुळे अतिशय दु:खी झाले
- “ना मी बॅनर लावणार, ना चहा देणार…” लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींचं विधान