• Download App
    बंगळुरूमध्ये एरोनिक्स इंटरनेट कंपनीच्या ‘सीईओ’ आणि ‘एमडी’ची तलवारीने वार करू हत्या! माजी कर्मचाऱ्यावर आरोप! CEO  and MD of Aeronics Internet Company were killed by a former employee

    बंगळुरूमध्ये एरोनिक्स इंटरनेट कंपनीच्या ‘सीईओ’ आणि ‘एमडी’ची तलवारीने वार करू हत्या! माजी कर्मचाऱ्यावर आरोप!

    …या गोष्टीचा होता मनात राग, पोलिसांनी दिली माहिती

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : एरोनिक्स इंटरनेट कंपनीचे CEO वेणू कुमार आणि MD फणींद्र सुब्रमण्य यांची एका माजी कर्मचाऱ्याने हत्या केली. हल्लेखोराने कार्यालयात घुसून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. ईशान्य बंगळुरूचे पोलीस आयुक्त लक्ष्मी प्रसाद यांनी माहिती दिली की, रुग्णालयात नेत असताना दोघांचाही मृत्यू झाला. तर हल्लेखोर फेलिक्स फरार आहे  आणि पुढील तपास सुरू आहे.  CEO  and MD of Aeronics Internet Company were killed by a former employee

    पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी सांगितले की, सीईओ आणि एमडीची माजी कर्मचाऱ्याने भरदिवसा हत्या केली आहे. फणींद्र सुब्रमण्यम आणि विनू कुमार अशी मृतांची ओळख पटली आहे. पंपा एक्स्टेंशन अमृतहल्ली येथे ही घटना घडली.

    आरोपी फेलिक्सने यापूर्वी एरोनिक्समध्ये काम केले होते परंतु त्याने स्वतःची कंपनी स्थापन करण्यासाठी नोकरी सोडली, जी प्रतिस्पर्धी व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. मृतक त्याच्या व्यवसायात अडथळा आणत होते. या कारणामुळे फेलिक्स त्याच्यावर खूप रागावला आणि त्याने त्यांना मारले.

    CEO  and MD of Aeronics Internet Company were killed by a former employee

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Arunachal Pradesh : रेप-छेडछाडीच्या आरोपीची जमावाकडून पोलिस ठाण्याबाहेर हत्या; 20हून अधिक अल्पवयीन मुलींचे शोषण

    बिहारमध्ये मतदार यादीत आढळले बांगलादेशी, म्यानमारी आणि नेपाळी; पण शेतकरी आणि अल्पसंख्यांकांचे लेबल लावून काँग्रेस लढणार त्यांच्यासाठी!!

    राज्यसभा निवडणुकीसाठी खरी चुरस 2026 मध्ये; कारण निवृत्त होणाऱ्यांमध्ये पवार, देवेगौडा, दिग्विजय सिंह आणि खर्गे!!; पवार पुढे काय करणार??