• Download App
    केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) SC/ST/OBC/EWS/PwBD या कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी एक हेल्पलाइन क्रमांक | Central Public Service Commission (UPSC) has a helpline number for candidates in SC / ST / OBC / EWS / PwBD category

    केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) SC/ST/OBC/EWS/PwBD या कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी एक हेल्पलाइन क्रमांक

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)  SC/ST/OBC/EWS/PwBD या कॅटेगरी मधील उमेदवारांसाठी एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. ह्या कॅटेगरी मधील इच्छुक उमेदवार कोणत्याही परीक्षा किंवा भरती संबंधि सर्व प्रश्नांसाठी 1800118711 या टोल फ्री क्रमांकावर यूपीएससी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या शंका विचारू शकतात.

    Central Public Service Commission (UPSC) has a helpline number for candidates in SC / ST / OBC / EWS / PwBD category

    अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी), आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (ईडब्ल्यूएस) आणि बेंचमार्क अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूबीडी) या कॅटेगरी मधील सर्व इच्छुक विद्यार्थ्यांसाठी हा हेल्प लाइन क्रमांक अतिशय उपयुक्त असेल.


    UPSC Civil परीक्षेतील घवघवीत यश! १३१ उमेदवार उत्तीर्ण! राचकोंडा पोलिस आयुक्त IPS महेश भागवत यांच्या मोफत मार्गदर्शनामुळे झाले शक्य


    ह्या हेल्पलाईन मूळे upsc ची परीक्षा देत असणाऱ्या किंवा देण्याची इच्छा असणाऱ्या सर्व उमेदवारांना त्यांचे प्रश्न आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारणे, चर्चा करणे या साठी उपयुक्त असेल. ही हेल्पलाईन आठवड्यातील कामकाजाच्या दिवसांमध्येच चालू राहील.

    आयोगाने जारी केलेल्या सूचनेनुसार, वरील प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही परीक्षा/ भरतीचे अर्ज भरण्यात किंवा आयोगाच्या परीक्षा/ भरतीसंबंधी कोणत्याही प्रश्नांसाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत असल्यास, या समर्पित हेल्पलाईनवर मदतीसाठी संपर्क साधू शकतात. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार यूपीएससीची अधिकृत साइट तपासू शकतात.

    Central Public Service Commission (UPSC) has a helpline number for candidates in SC / ST / OBC / EWS / PwBD category

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली