Corona Vaccination : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी सध्या भारताचा संघर्ष सुरू आहे. यादरम्यान लसीकरणाला वेग देण्याची मागणी राज्यांकडून सातत्याने केली जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावरून आठ राज्यांसह बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात 8 कोटी लस डोस उपलब्ध होत आहेत आणि पुढच्या महिन्यात 9 कोटी डोस उपलब्ध होतील. या बैठकीत जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, बिहार, झारखंड, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांचा समावेश होता. Central Health Minister Dr harsh Vardhan Meeting With 8 states On Corona Vaccination
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेशी सध्या भारताचा संघर्ष सुरू आहे. यादरम्यान लसीकरणाला वेग देण्याची मागणी राज्यांकडून सातत्याने केली जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावरून आठ राज्यांसह बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, या महिन्यात म्हणजेच मे महिन्यात 8 कोटी लस डोस उपलब्ध होत आहेत आणि पुढच्या महिन्यात 9 कोटी डोस उपलब्ध होतील. या बैठकीत जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, बिहार, झारखंड, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांचा समावेश होता.
केंद्राकडून 15 दिवस आधीच लस पुरवठ्याची माहिती
केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, लसीची उपलब्धता हळूहळू वाढेल अशी अपेक्षा आहे. सर्वप्रथम, ज्यांना दुसरा डोस घ्यायचाय, त्यांना प्राधान्य द्यावे, जेणेकरून त्यांचे लसीकरण अपूर्ण राहणार नाही. ते म्हणाले की, 30 एप्रिल रोजीच राज्यांना स्पष्ट केले होते की, येत्या 15 दिवसांत किती डोस देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे 14 मे रोजीही आम्ही आपल्याला पुढील 15 दिवसांत ही लस किती आणि केव्हा उपलब्ध होईल ते सांगू.
तत्पूर्वी, डॉ. हर्षवर्धन यांनी असेही म्हटले होते की, राज्यांनी ज्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे, अशांचा प्राधान्याने विचार करावा. यासाठी 70 टक्के डोस राखीव ठेवावेत. त्याचबरोबर या लस वाया जाण्याचे प्रमाणत कचरा कमीत राहील याची दक्षताही राज्यांनी घ्यावी.
देशातील लसीकरणाची सद्य:स्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कोरोनावरील लसींचे 17.52 कोटी डोस देण्यात आले आहेत. बुधवारी सकाळी सात वाजेच्या अहवालानुसार, 25,47,534 सत्रांद्वारे लसीचे 17,52,35,991 डोस देण्यात आले. यापैकी 95,82,449 आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम डोस देण्यात आले, तर 65,39,376 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला. याव्यतिरिक्त 45 ते 60 वर्षे वयोगटातील 5,58,83,416 लोकांना प्रथम डोस आणि 78,36,168 लोकांना दुसरा डोस देण्यात आला, तर ज्येष्ठांमध्ये 5,39,59,772 लोकांना पहिला डोस आणि 1, 62,88,176 हा दुसरा डोस देण्यात आला. गेल्या 24 तासांत 24.4 लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले. लसीकरणाच्या 116व्या दिवशी (11 मे रोजी) 24,46,674 डोस देण्यात आले.
Central Health Minister Dr harsh Vardhan Meeting With 8 states On Corona Vaccination
महत्त्वाच्या बातम्या
- आत्मनिर्भर भारत : आता भारतातच बनणार इलेक्ट्रिक कारची बॅटरी, मोदी मंत्रिमंडळाची 18100 कोटींच्या PLIला मंजुरी
- मोठा निर्णय : DRDOच्या ऑक्सिकेयर सिस्टिम खरेदीला पीएम केअर्स फंडची मंजुरी, दीड लाख युनिटची करणार खरेदी
- मूडीजने घटवला भारताचा जीडीपी वाढीचा दर, जूननंतर अर्थव्यवस्था पुन्हा बहरण्याचे भाकीत
- देशात आणीबाणी लागू करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची याचिकेद्वारे मागणी, मद्रास हायकोर्टाने फेटाळली
- पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार, संशयित हल्लेखोराला अटक