• Download App
    तिसऱ्या लाटेच्या लढ्यासाठी केंद्र सरकार तयार करणार एक लाख कोरोना योद्धे|Central Govt. will skilled one lack covid warriors

    तिसऱ्या लाटेच्या लढ्यासाठी केंद्र सरकार तयार करणार एक लाख कोरोना योद्धे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाचा विषाणू नवनवीन प्रकारात पुढे येत असल्याने लोकांना सतत सावध राहावे लागेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. केंद्र सरकारच्या वतीने नजीकच्या काळात एक लाख कोरोना योद्धे तयार करण्याची योजना असून त्यांच्यासाठीच्या क्रॅश कोर्सचे उद्घा्टन मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले.Central Govt. will skilled one lack covid warriors

    देशातील २६ राज्यांत हा अभ्यासक्रम राबविण्यात येईल. पंतप्रधानांनी हेही स्पष्ट केले की हे एक लाख प्रशिक्षित आघाडीवीर ग्रामीण भागांतील प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामाजिक आरोग्य केंद्रे व विशेषतः ग्रामीण भागांत डॉक्टरांच्या मदतीसाठी तैनात केले जातील.



    त्यांचा दोन लाखांचा वैद्यकीय विमाही प्रशिक्षण काळातच काढला जाईल. या योजनेसाठी केंद्राने २७६ कोटींचा खर्च केला आहे. कौशल्य विकास योजनेचा हा तिसरा टप्पा आहे.कोरोनाची तिसरी लाट दरवाजावर असल्याचा इशारा वैज्ञानिक वारंवार देत आहेत.

    त्यामुळे असे संकट ओढवले तरी त्याची संहारकता दुसऱ्या लाटेपेक्षा कमी असावी असा उद्देश आहे. यादृष्टीने १११ प्रशिक्षण केंद्रांत एक लाख तरुणांना प्रशिक्षित करून त्यांची डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी नेमणूक केली जाईल.

    Central Govt. will skilled one lack covid warriors

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा