• Download App
    ‘पेगॅसस’ प्रकरणी तज्ञांची समिती स्थापन करण्याची मोदी सरकारची तयारी|Central Govt. will ready for appoint panal

    ‘पेगॅसस’ प्रकरणी तज्ञांची समिती स्थापन करण्याची मोदी सरकारची तयारी

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – पेगॅसस कथित पाळतप्रकरणावरून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये शपथपत्र सादर करताना यात लपविण्यासारखे काहीही नसल्याचे स्पष्ट केले.केंद्र सरकारने याप्रकरणी विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याची तयारी दर्शविली आहे.Central Govt. will ready for appoint panal

    पेगॅसस कथित पाळतप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड उठविली असतानाच या प्रकरणामध्ये काहीही लपविण्यासारखे नाही असा दावा करतानाच सरकारने याप्रकरणाशी संबंधित विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. केंद्राने याबाबतचे एक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.



    ‘पेगॅसस’ या स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील काही निवडक लोकांवर सरकारने पाळत ठेवल्याचा आरोप करत अनेकांनी या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली होती. तशी मागणी करणाऱ्या काही याचिका या सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे.

    सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, की ‘‘ राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने देखील याचा विचार करण्यात येईल कारण हे प्रकरण संवेदनशील आहे. आम्ही देखील याचा फार संवेदनशीलपणे विचार करत आहोत. हे प्रकरण तांत्रिक आणि अधिक क्लिष्ट असल्याने तज्ज्ञांनीच याचा आढावा घेणे गरजेचे आहे. यात लपविण्यासारखे काहीही नाही. ’’

    Central Govt. will ready for appoint panal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tamil Nadu : तामिळनाडूत विजय यांचा शपथविधी लांबू शकतो; सरकार स्थापनेसाठी 118 आमदार हवे, TVK कडे 113

    Sabarimala : सुप्रीम कोर्टाने म्हटले- PIL आता ‘पैसा इंटरेस्ट लिटिगेशन’ बनली; शबरीमाला प्रकरणात वकिलांनी याचिका दाखल केली

    S-400 Squadrons : एस-400 चे 5 नवीन स्क्वॉड्रन खरेदीची तयारी; 1 स्क्वॉड्रनमध्ये 8 लाँचर, प्रत्येक लाँचरमध्ये 4 क्षेपणास्त्रे; एक लाख कोटी रुपयांचा करार