विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डीए पुन्हा त्यांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशभरातील ५२ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा धनलाभ होईल. केंद्राच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा मिळेल.Central govt, will give DA to govt. employies
मागील वर्षी कोरोना लॉकडाउनच्या काळात केंद्राने डीए देणे केले होते.आता तो पुन्हा मिळणार असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे.
ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते जून २०२१ या काळासाठी चार टक्क्यांची वाढही होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसे झाले तर सध्याच्या १७ टक्यां ऐवजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना २८ टक्के डीएचा लाभ होईल.
जानेवारी ते जून २०२० या काळासाठी तीन टक्के, जुलै ते डिसेंबर २००० साठी चार टक्के आणि जून २०२१ साठी चार टक्के अशी ही वाढ असेल. ही प्रस्तावित वाढ त्यांच्या प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युईटीसाठीही लाभदायक ठरेल.