Covid-19 vaccine : देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे परंतु राज्यांमध्ये लसीचा तुटवडा अद्यापही आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले आहे की, 1.65 कोटी लसीचे डोस अद्याप राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, किमान नऊ राज्यांनी जानेवारी ते मार्चदरम्यान पुरविल्या गेलेल्या कोरोना लसीच्या डोसचा पुरेपूर वापर केलेला नाही. यामुळे कोरोनाविरुद्धची लसीकरण मोहीम मंदावली. Central Govt Said, Nine states underutilized Covid-19 vaccine doses
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे परंतु राज्यांमध्ये लसीचा तुटवडा अद्यापही आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे म्हटले आहे की, 1.65 कोटी लसीचे डोस अद्याप राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, किमान नऊ राज्यांनी जानेवारी ते मार्चदरम्यान पुरविल्या गेलेल्या कोरोना लसीच्या डोसचा पुरेपूर वापर केलेला नाही. यामुळे कोरोनाविरुद्धची लसीकरण मोहीम मंदावली.
16 जानेवारीपासून ऐतिहासिक लसीकरण मोहीम सुरू
16 जानेवारी रोजी भारताने कोरोनाविरुद्ध जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू केली. 31 मार्चपर्यंत चाललेल्या या मोहिमेच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये विशेषतः आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश होता. त्यानंतर 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या आणि त्यानंतर 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ही लस दिली गेली.
राज्यांना देण्यात आलेल्या लसी दरमहा वाढल्या
‘हिंदुस्थान टाइम्स’च्या वृत्तानुसार राजस्थान, पंजाब, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड, केरळ, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांनी त्यांना पुरवण्यात आलेल्या लसीचा पुरेपूर वापर केला नाही. “ही राज्ये, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात केंद्राकडून लसांचा भरीव पुरवठा करूनही त्यांच्या लोकसंख्येचा एक मोठा भाग प्रभावीपणे लसीकरण करण्यात अयशस्वी ठरली,” असे एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.” या सर्व राज्यांना केंद्राने दरमहा लसींची संख्या वाढवून दिली आहे.
कोणत्या राज्यात किती लस दिल्या?
या अधिकाऱ्याने सांगितले की, लसीबाबत जागरूकता नसणे व संकोच यामुळे लसीकरण मंदावले होते. तीन महिन्यांत राजस्थानला देण्यात आलेल्या 1.06 कोटी डोसपैकी केवळ 0.57 कोटी डोसचा उपयोग झाला. पंजाबला दिलेल्या 0.29 कोटी डोसपैकी केवळ 8 लाख 40 हजार वापरण्यात आले. छत्तीसगडला मिळालेल्या 0.43 कोटी डोसपैकी केवळ 0.19 कोटी वापरण्यात आले. तेलंगणमध्ये 0.41 कोटींपैकी केवळ 0.13 कोटी लसीचे डोस वापरले गेले. आंध्र प्रदेशला प्राप्त झालेल्या 0.66 कोटी लसींपैकी 0.26 कोटी आणि झारखंडमध्ये 0.31 कोटींपैकी जवळपास 0.16 कोटी वापरण्यात आले. याव्यतिरिक्त केरळला दिलेल्या 0.63 कोटी लसींपैकी केवळ 0.34 कोटी डोस वापरले गेले. येथे केंद्राने दिलेल्या 1.43 कोटी डोसपैकी महाराष्ट्राने केवळ 0.62 कोटी डोस वापरले, तर दिल्लीने 0.44 कोटींपैकी फक्त 0.24 कोटी डोसचाच वापर केला.
Central Govt Said, Nine states underutilized Covid-19 vaccine doses
महत्त्वाच्या बातम्या
- विरोधकांच्या कोलांटउड्यांमुळे पुन्हा केंद्राकडेच लसीकरणाची कमान, पीएम मोदींच्या निर्णयामागील महत्त्वाचे मुद्दे
- Modi Speech : राज्ये अपयशी ठरल्याने केंद्रानेच घेतली पुन्हा जबाबदारी; आता २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच मोफत लस
- उध्दव ठाकरे, अजित पवार उद्या पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षण, कोरोनावर चर्चा
- सगळं द्या द्या कसं, आधी तुम्ही पेट्रोल-डिझेलवरील १० रुपये टॅक्स कमी करा, चंद्रकांत पाटील यांचा महाराष्ट्र सरकारला सल्ला
- हसन मुश्रीफ यांचा अजब दावा, म्हणे महाराष्ट्राला लस पुरविण्यावरून केंद्राने तंबी दिल्याने आदर पूनावाला लंडनला जाऊन बसले