प्रतिनिधी
नवी दिल्ली : सन २०१९-२० मध्ये एमबीबीएसचे (MBBS) प्रथम शैक्षणिक वर्षातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. २०१९-२० या काळात प्रथम वर्ष एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना भेटून यसंदर्भात विनंती केली होती. Central Govt relief for MBBS students
कोविड विषयक तत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन डॉ. भारती पवार (MBBS) यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे पाठपुरावा व केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या बाबत विस्तृत चर्चा करून या विद्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून दिली आहे.
या विद्यार्थ्यांना (MBBS) आधीच्या नियमांनुसार पहिल्या चार प्रयत्नांमध्ये त्यांची पहिली व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. मात्र २०१९-२० या काळात कोविड-१९ या आजाराच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात आणि देशात लॉकडाऊन असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये बंद होती, त्यामुळे या काळातील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला होता.यामुळे अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नसल्याने त्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी निर्माण करून द्यावी, अशी भूमिका भारती पवार यांनी केंद्रीय वैद्यकीय आयोगापुढे मांडली.
या विषयी आयोगाने चर्चा केली आणि डॉ. भारती पवार (MBBS) यांच्या भूमिकेला मान्यता देत या विध्यार्थ्यांना पाचव्या वेळेस परीक्षा देण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला . या निर्णयाला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी ही मान्यता दिली आहे.
Central Govt relief for MBBS students
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची मोहब्बत की दुकान शुरू; याचा अर्थ हिजाबला अच्छे दिन, पीएफआय कारवाया पर्दानशीन!!
- केरळमध्ये NCB आणि नौदलाची मोठी कारवाई; तब्बल १२ हजार कोटींचे २५०० किलो ड्रग्ज जप्त!
- कर्नाटकात जेडीएस, महाराष्ट्रात राष्ट्रवादी; काँग्रेससाठी दोन्ही पक्ष “राजकीय गिऱ्हाईक”!!
- उत्तर प्रदेशात स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय होऊनही विरोधकांचा ईव्हीएम विरोधात आरडाओरडा का नाही??; “रहस्य” काय??