गृह मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.
प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ भरतीची योजना आणली तेव्हा विरोधी पक्षांनी त्याला कडाडून विरोध केला. भारतातील तरुण लोकसंख्या लक्षात घेऊन लष्कराला बळकटी देण्यासाठी अग्निपथ योजना आणण्यात आली होती, परंतु काँग्रेस आणि डाव्या लिबरल टोळीने या योजनेच्या विरोधात देशात चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला. अग्निवीर चार वर्षांनंतर सैन्यातून परतल्यावर काय करणार?, अशाप्रकारे अनेक प्रश्न प्रकारे उपस्थित केले गेले की, चार वर्षानंतर जेव्हा अग्निवीर परत येतील तेव्हा ते काय करतील? ते देशासाठी आणि समाजासाठी धोकादायक ठरतील इत्यादी नकारात्मक विचारांनी ग्रस्त अशा विरोधी पक्षांना हे नाही समजले की जेव्हा चार वर्षांनंतर कुशल, शिस्तप्रिय जवान सैन्यातून परत येतील तेव्हा त्यांना देशात नोकरीची उणीव भासणार नाही. Central govt has declared 10 percent reservation for ex Agniveers in vacancies within BSF as well as relaxed upper age limit
जेव्हा ही योजना आणली गेली, त्याच वेळी देशातील अनेक राज्य सरकारे आणि बड्या कंपन्यांनी अग्निवीरांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली होती. आता केंद्र सरकारने सशस्त्र सीमा दल (बीएसएफ) मधील भरतीमध्ये माजी अग्निवीरांना १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे.
मोदी सरकारमध्ये अर्थव्यवस्था बळकट, जानेवारीत देशाच्या औद्योगिक उत्पादनात ५.२ टक्के वाढ!
होय, भारतीय लष्करात अग्निवीर भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने सशस्त्र सीमा दल (बीएसएफ) मधील रिक्त पदांवर माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. एवढेच नाही तर अग्निवीरांना वयोमर्यादेच्या उच्च निकषांमध्येही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते पहिल्या बॅचचा भाग आहेत की त्यानंतरच्या बॅचेसचा यावर ते अवलंबून आहे. गृह मंत्रालयाने ६ मार्च रोजी यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली. यासाठी, गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दल, जनरल ड्युटी कॅडर भरती नियम, २०१५ मध्ये सुधारणा केली आहे, जी ९ मार्च २०२३ पासून लागू झाली आहे.
गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, कॉन्स्टेबल पदासाठी, माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीच्या उमेदवारांना वयात पाच वर्षांची सूट दिली जाईल, तर त्यानंतरच्या सर्व माजी अग्निवीरांच्या तुकड्यांना ३ वर्षांची सूट दिली जाईल. यासोबतच आणखी एक दुरुस्ती करण्यात आली असून त्यात माजी अग्निवीर कर्मचाऱ्यांना शारीरिक चाचणीतून सूट देण्यात आली आहे.
Central govt has declared 10 percent reservation for ex Agniveers in vacancies within BSF as well as relaxed upper age limit
महत्वाच्या बातम्या
- गुजरात विधानसभेत बीबीसीविरोधात ठराव मंजूर, डॉक्युमेंट्री प्रकरणी कठोर कारवाईची केंद्राला विनंती
- लालू प्रसाद यादव यांची एकच घोषणा ‘तुम्ही मला भूखंड द्या, मी तुम्हाला नोकरी देतो’ – अनुराग ठाकुर
- ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे निधन, 20 व्या मजल्यावरून पडून झाला मृत्यू
- ईडीने कोर्टात सांगितले सिसोदिया आणि कविता यांचे कनेक्शन, आरोपपत्रात मुख्यमंत्री केजरीवाल-संजय सिंह यांच्यावरही आरोप