Corona vaccination : केंद्र सरकारने राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना हॉटेलच्या भागीदारीत कोविड लसीकरणाचे पॅकेजेस देणार्या संस्थांवर कायदेशीर किंवा प्रशासकीय कारवाई करण्यास सांगितले आहे. केंद्राचे म्हणणे आहे की, हे निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. आरोग्य राज्य मंत्रालयाचे अवर-सचिव मनोहर अगनानी यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “काही खासगी रुग्णालये तसेच काही हॉटेल्स कोविड लसीकरणासाठी पॅकेज देत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. हे राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे. Central Govt Dirtect To State And UTs To take Action against hospitals giving Corona vaccination package with hotels
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना हॉटेलच्या भागीदारीत कोविड लसीकरणाचे पॅकेजेस देणार्या संस्थांवर कायदेशीर किंवा प्रशासकीय कारवाई करण्यास सांगितले आहे. केंद्राचे म्हणणे आहे की, हे निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. आरोग्य राज्य मंत्रालयाचे अवर-सचिव मनोहर अगनानी यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “काही खासगी रुग्णालये तसेच काही हॉटेल्स कोविड लसीकरणासाठी पॅकेज देत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. हे राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे.
पत्रात अगनानी यांनी लिहिले आहे की, राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत सरकारी कोविड लसीकरण केंद्र आणि खासगी कोविड लसीकरण केंद्र, कामाची जागा, वृद्धांसाठी आणि भिन्न-अपंग लोकांसाठी इतर कोणत्याही ठिकाणी लसीकरण करता येणार नाही. म्हणून हॉटेल्समध्ये लसीकरण करणे या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे आणि ते त्वरित थांबवावे.
देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड-19 लसीच्या एकूण डोसची संख्या 21 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. मंत्रालयाने सांगितले की, शनिवारी 18-44 वयोगटातील 14,15,190 लोकांना पहिला डोस देण्यात आला आणि त्याच गटातील 9075 लोकांना कोविड-19 लसीचा दुसरा डोस देण्यात आला. लसीकरण मोहिमेच्या तिसर्या टप्प्याच्या सुरुवातीपासूनच देशभरात एकूण 1 कोटी 82 लाख 25 हजार 509 लोकांना प्रथम डोस देण्यात आला आहे. बिहार, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात 18 ते 44 वयोगटातील दहा लाखांहून अधिक लाभार्थींना या लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
Central Govt Dirtect To State And UTs To take Action against hospitals giving Corona vaccination package with hotels
महत्त्वाच्या बातम्या
- Modi Government 2.0 : मोदी सरकारची 2 वर्षे पूर्ण, भाजप खासदार-आमदार जल्लोषाऐवजी गावोगावी भेट देणार
- गोव्याचा पर्यटनाचा बेत रद्दच करा ; संचारबंदी 7 जूनपर्यंत वाढविली
- Cyclone Yaas Effect Odisha : चक्रीवादळात बाळ जन्मले नाव ठेवले ‘यास’ !अरेच्चा तब्बल ७५० बाळांचा जन्म ! काय म्हणावे ‘ यास ‘ ?
- Corona Vaccination : लसीकरण प्रमाणपत्र द्या, अन्यथा पगार नाही; उत्तरप्रदेशात आदेशाने कर्मचाऱ्यांची तारांबळ
- ठाणे : व्हॅक्सिन के लिए कुछ भी करेगा ! लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोविड सेंटरची सुपरवायजर ; भाजपने काढले वाभाडे