विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरातील मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून मे अखेरपर्यंत १.०५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. Central government’s plan for girls’ education; 1.05 lakh crore investment in Sukanya Samrudhi
सुकन्या समृद्घी योजनेत शून्य ते १० वर्ष असलेल्या मुलीच्या नावाने खाते उघडण्यात येते. त्यावर जमा होणाऱ्या खात्यावर ७.६ टक्के व्याज देण्यात येते.
बेटी बचाओ बेटी पढाओ या सरकारच्या अभियानाला गती देण्यासाठी जानेवरी २०१५ मध्ये ही योजना सुरु केली होती.
गुंतवुणूक कशी होते
- शून्य ते १० या वयोगटातील मुलीचे खाते काढावे
- त्यामध्ये मासिक किंवा वार्षिक रक्कम भरावी
- सलग १५ वर्ष हप्ते भरावेत
- २१ व्या वर्षी खात्यात जमा झालेली रक्कम ७.६ टक्के व्याजाने परत मिळते.
- पालक १८ व्या वर्षीही रक्कम काढू शकतात
- कमीत कमी २५० रुपये प्रती महिना या प्रमाणे खाते उघडता येते
- वर्षाला तुम्ही जास्तीत जास्त १.५ लाख गुंतवू शकता
- ही रक्कम ८० सी अंतर्गत आयकर मुक्त आहे
- या रक्कमेतून तुम्ही मुलीला उच्च शिक्षण देऊ शकता
महत्त्वाच्या बातम्या
-
- भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट हॅक झाल्याने खळबळ ; पाकिस्तानी हॅकरचे कृत्य ?
- गेल्या अधिवेशनात संजय राठोड, अनिल देशमुखांच्या विकेट गेल्या; पावसाळी अधिवेशनात अजित पवार, अनिल परबांच्या विकेट पडणार…??
- सुकन्या समृद्घी योजनेला मोठा प्रतिसाद; मे अखेरपर्यंत १.०५ लाख कोटींची गुंतवणूक
- शेतकरी धर्मालाच फासला हरताळ, भाजपा नेत्याच्या शेतातील धान्य उपटून काढले
- लोकशाहीच्या नावाने गळे काढणाऱ्या केजरीवालांची हुकूमशाही, टीका केली म्हणून विद्यार्थिनीला ठोठावला पाच हजार रपिये दंड, परीक्षेला बसू देणार नसल्याचा इशारा