प्रतिनिधी
नवी दिल्ली : खाद्यतेल आणि डाळी यांच्या किमती कमी करण्याचे प्रयत्न करण्याबरोबरच येत्या दसरा दिवाळीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना केंद्र सरकारकडून आणखी मोठे गिफ्ट मिळू शकते. सणासुदीच्या काळात एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात जवळपास २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एलपीजी सिलेंडरचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार अतिरिक्त सबसिडी लागू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्र सरकार लवकरच काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. Central Government’s Dussehra Diwali Gift Soon; LPG cylinders will be cheaper
अतिरिक्त सबसिडी लागू करण्याच्या तयारीत
गेल्या काही वर्षांमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्षभरात गॅस सिलेंडरचे दर २४४ रुपयांनी वाढले. सध्या दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत १०५३ रुपये आणि सबसिडी ८५३ रुपये आहे. तर घरगुती गॅसची किंमत १०५२ रुपये आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेल आणि गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम देशातील एलपीजी गॅसच्या किंमतींवर होत आहे. ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला होता. यानंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यासाठी अतिरिक्त अनुदान देण्यावर सरकारकडून विचार सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार २५ ते ३० हजार कोटी रुपये खर्च करू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Central Government’s Dussehra Diwali Gift Soon; LPG cylinders will be cheaper
महत्वाच्या बातम्या
- पाकमध्ये हिंदूंसाठी आवाज उठवल्याबद्दल पत्रकाराला अटक : अल्पसंख्याकांना पूर मदत छावण्यांमधून बाहेर काढले, फक्त मुस्लिमांसाठी जागा
- द फोकस एक्सप्लेनर : ममता, नितीश-अखिलेश आणि शरद पवार एकत्र आल्यास किती जागांवर होईल परिणाम, काय सांगतात आकडे? वाचा सविस्तर…
- नितीश कुमार यांच्यासोबत पुन्हा पीकेंच्या नावाची चर्चा, पुन्हा एकत्र येण्याची शक्यता
- १.५४ लाख कोटींचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला नेला, पण लाभ देशाला!!; वाचा अनिल अग्रवालांची ट्विट्स!!