विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील लाखो करदात्यांसाठी केंद्र सरकारने देशभरातील ७५ हजार कॉमन सर्व्हिस सेंटरवर प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सेंटरवरून किमान २५ लाख आयटीआर भरले जातील, असा अंदाज सरकारने व्यक्त केला आहे.Central Government’s announcement for income tax payers, returns can be filed at 75,000 Common Service Centers in the country
प्राप्तिकर विवरण सादर करण्यासाठी आता अवघा एक आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. सदोष वेबपोर्टलमुळे सुरुवातीला काही महिने आॅनलाईन रिटर्न फायलिंग करताना अनेक अडचणी येत होत्या. याबाबत अर्थमंत्र्यांनी देखील दखल घेतली होती. करदात्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सरकारने विवरण पत्र सादर करण्यास मुदतवाढ दिली.
आता काही दिवस शिल्लक असल्याने सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण खात्याने शहरी आणि निमशहरी भागात असलेल्या ७५ हजारांहून अधिक कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये प्राप्तिकर फायलिंगची सुविधा सुरु केली आहे.
कॉमन सर्व्हिस सेंटरवर नागरिकांना विविध सुविधा दिल्या जातात. दाखले आणि सरकारशी संबंधित परवाने या सेंटरवर प्रोसेस केले जातात.कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये २०१५ पासून काही कंपन्यांच्या माध्यमातून आयटीआर फायलिंगची सुविधा दिली जात असल्याचे कॉमन सर्व्हिस सेंटर विभागाचे संचालक डॉ. दिनेश त्यागी यांनी सांगितले.
ई रिटर्न फायलिंग सुविधेमुळे करदात्यांपुढे कॉमन सर्व्हिस सेंटरचा आणखी एक पर्याय उपलब्ध होईल. यंदा किमान २५ लाख आयटीआर कॉमन सर्व्हिस सेंटरमधून प्रोसेस होतील, असे त्यांनी यांनी सांगितले.
करदात्याला ओळखपत्रे आणि माहिती घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटर जावे लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर चालक या माहितीची डेटा एंट्री करेल. ज्या कंपनीशी कॉमन सर्व्हिस सेंटरचा करार आहे त्यांच्याकडून संबंधित करदात्याला फोन येईल. पुढे सर्व माहिती संकलित करून ई फायलिंगची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
त्यानंतर ३ ते ७ दिवसांत आयटीआर दाखल होईल. ई व्हेरिफिकेशन झाल्यानंतर करदात्याला एसएमएस आणि ई मेलमधून विवरणपत्र दाखल झाल्याची माहिती प्राप्त होईल. कर विवरण २० ते २५ दिवसांत ईमेलवर प्राप्त होईल आणि पुढे कर परतावा ,टीडीएस असल्यास तो संबंधित करदात्याच्या खात्यात आॅनलाईन जमा होईल.
Central Government’s announcement for income tax payers, returns can be filed at 75,000 Common Service Centers in the country
महत्त्वाच्या बातम्या
- अहमदनगर मधील जवाहर नवोदय विद्यालयांमधील 52 विद्यार्थ्यांना कोरोणाची लागण
- नागालँडमधून AFSPA हटवण्याबाबत समितीची स्थापना, मुख्यमंत्री नेफियु रिओ यांची घोषणा
- ख्रिसमस निमित्त सांता क्लॉजचा ड्रेस घातलेल्या 100 स्त्रियांनी बंगलोर मध्ये ऑर्गनायझ केली बाईक रॅली
- पुलवामा येथील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला ; हल्ल्यात दोन पोलीस जखमी