• Download App
    पंतप्रधानांच्या दौऱ्यातील हलगर्जीपणा भोवणार, पोलीस महासंचालक, पाच पोलीस अधीक्षकांसह १३ अधिकाऱ्यांना केंद्र सरकारचे समन्स|Central government summons 13 officials, including five superintendents of police, for negligence in PM's visit

    पंतप्रधानांच्या दौऱ्यातील हलगर्जीपणा भोवणार, पोलीस महासंचालक, पाच पोलीस अधीक्षकांसह १३ अधिकाऱ्यांना केंद्र सरकारचे समन्स

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा राजकीय कारणातून झाला असल्याचे म्हटले जात असले तरी याचा फटका पोलीस अधिकाऱ्यांना बसणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने ५ जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांसह १३ अधिकाऱ्यांना समन्स पाठवले आहे.Central government summons 13 officials, including five superintendents of police, for negligence in PM’s visit

    पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी पंजाबचे पोलीस महासंचालक , पोलीस महानिरीक्षक आणि इतर वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना हे समन्स देण्यात आलं आहे. मोगा, मुक्तसर साहिब, फरीदकोट आणि तरन तारन जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांचाही समन्स बजावण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. या प्रकरणी १५० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



    पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांची फिरोजपूरमधील रॅली रद्द झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाब दौऱ्यावर होते. ते सकाळी विमानाने भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते.

    पण खराब हवामानामुळे काही काळ वाट पाहूनही हेलिकॉप्टरने जाणं अशक्य झाल्यामुळे त्यांनी अखेर गाडीनेच हुसैनीवालाला जायचा निर्णय घेतला. या दोन तासाच्या प्रवासात हुसैनीवालापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांचा ताफा अडकला कारण पुढे काही आंदोलक आंदोलन करत होते.

    २० मिनिटे थांबल्यानंतर अखेर पंतप्रधानांनी आपला दौरा रद्द करून दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला.यावरून भाजपाकडून पंजाबमधील काँग्रेसशासित सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. खुद्द पंतप्रधानांच्याच सुरक्षेत कसूर ठेवल्याचा आरोप केंद्र सरकारने पंजाब सरकारवर केला आहे.

    केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकारावर पंजाब सरकारकडे खुलासा देखील मागितला आहे. यासंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    Central government summons 13 officials, including five superintendents of police, for negligence in PM’s visit

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका