• Download App
    सक्तीच्या धर्मांतराविरोधी कायद्याच्या दिशेने केंद्राचे पाऊल; सुप्रीम कोर्टात मांडली ठाम भूमिका Central government firm on anti conversion law, assertive approach in Supreme court

    सक्तीच्या धर्मांतराविरोधी कायद्याच्या दिशेने केंद्राचे पाऊल; सुप्रीम कोर्टात मांडली ठाम भूमिका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सध्या देशात लव्ह जिहादच्या माध्यमातून मुसलमान जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याची प्रकरणे दररोज घडत असताना, तर दुसरीकडे ख्रिस्ती मिशनरी प्रलोभने दाखवून धर्मांतर करतच असतात, अशा या धर्मांतराच्या विरोधात देशपातळीवर कायदा करण्यात यावा, यासाठी सुप्रीम कोर्टात सरकारने थांब भूमिका मांडली आहे. Central government firm on anti conversion law, assertive approach in Supreme court

    सक्तीच्या धर्मांतराविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर काल सोमवारी, २८ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. तेव्हा केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे आपली भूमिका मांडली. सक्तीचे धर्मांतर ही गंभीर बाब आहे. धर्म स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये फसवणूक, जबरदस्ती, प्रलोभन किंवा अशा इतर मार्गांनी धर्मांतर करण्याचा अधिकार समाविष्ट नाही. त्यामुळे केंद्र सरकार सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदा करण्याचा बाजूने आहे, असे स्पष्टपणे नमूद केले.


    Supreme Court : मध्य प्रदेशात ओबीसी राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा; सुप्रीम कोर्टाची परवानगी


    ९ राज्यांनी केला कायदे 

    ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हरियाणा या 9 राज्यांनी सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी आधीच कायदे केले आहेत. यासोबतच महिला, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासह समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देण्यासाठी असे कायदे आवश्यक आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. न्यायमूर्ती एम. आर. शाह आणि न्यायमूर्ती सी. टी. रवी कुमार यांच्या खंडपीठासमोर सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील अश्विनी उपाध्याय यांच्या या याचिकेवर सुनावणी झाली.

    तर देशात हिंदू अल्पसंख्यांक होतील 

    जबरदस्तीने होणारे धर्मांतर थांबवले नाही, तर हिंदू लवकरच भारतात अल्पसंख्याक होतील, असे या याचिकेत म्हटले आहे. यापूर्वी 14 नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने सक्तीचे धर्मांतर हा अत्यंत गंभीर मुद्दा असल्याचे म्हटले होते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले होते आणि सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी कोणती पावले उचलली जाऊ शकतात याबाबत केंद्राला आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. धर्मस्वातंत्र्य आहे, पण सक्तीच्या धर्मांतराला स्वातंत्र्य नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नमूद केले होते. त्यावर केंद्र सरकारने देखील सुप्रीम कोर्टाच्या मताच्या अनुषंगानेच अनुकूल भूमिका घेतली.

    Central government firm on anti conversion law, assertive approach in Supreme court

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bhagwat : ऑपरेशन सिंदूरवर भागवत म्हणाले- सर्व पक्षांनी सहकार्य केले; सरकारने कारवाई केली आणि दोषींना शिक्षा झाली

    गवत खाऊन अणुबॉम्ब बनविण्याची भाषा करणाऱ्या आजोबाच्या नातवाची पाण्यावरून अणुबॉम्ब युद्धाची भाषा!!

    Reserve Bank : रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटविला, गृह कर्जाचा हप्ता किती रुपयांनी कमी होणार??, सामान्यांना किती फायदा??, वाचा आकडा!!