• Download App
    केंद्र सरकारचा आणखी एक सुखद निर्णय: कोरोनावरील लसी-ऑक्सिजन-उपकरणांवरील सीमाशुल्क आणि आरोग्य सेस माफ ! Central Government decided to full exemption to basic custom duty and health cess on import of Oxygen 

    केंद्र सरकारचा आणखी एक सुखद निर्णय: कोरोनावरील लसी-ऑक्सिजन-उपकरणांवरील सीमाशुल्क आणि आरोग्य सेस माफ

    • केंद्र सरकारवर कोरोनाच्या उपयायोजनांकडं दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या तीन दिवसांत घेतलेली कोरोनासंबंधीची ही तिसरी तातडीची बैठक आणि आणखी एक धडाकेबाज निर्णय आहे.

    • कोरोना महामारीशी संबंधित आढावा आणि उपायांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (24 एप्रिल) उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, तसेच अन्य महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये मोदी यांनी देशाला सध्या लिक्वीड ऑक्सिजनची मोठी गरज असल्याचे सांगितले. तसेच अशा परिस्थितीत सर्व मंत्रालयांनी एकजुटीने काम करणे गरजेचे असल्याचेसुद्धा मोदी म्हणाले.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देश मोठ्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळं मोदी सरकार अनेक दिलासादायक निर्णय घेत आहे. आता केंद्र सरकारनं कोरोनावरील लसी आणि ऑक्सिजनवरील आयातीवर लागणारे सीमा शुल्क आणि आरोग्य सेस तीन महिन्यांसाठी माफ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्च स्तरीय समितीच्या बैठकीनंतर लगेचच हा निर्णय जाहीर करण्यात आला. Central Government decided to full exemption to basic custom duty and health cess on import of Oxygen

    कोरोना किंवा इतर आजारासाठी लागणाऱ्या उपकरणांच्या आयातीवरील शुल्कही यामध्ये माफ केला जाणार आहेत.

    त्यात ऑक्सिजनबरोबरच त्यासाठीचे जनरेटर, स्टोरेज टँक, फिलिंग सिस्टीम आणि कॉन्सन्ट्रेटर यांच्या आयातीवरही ही सूट लागू असणार आहे. या उपकरणांच्या आयातीवर शुल्क माफ केल्यानं या सर्वांची उपलब्धता वाढेल आणि ते अधिक स्वस्तात मिळू शकतील असं मत केंद्र सरकारनं व्यक्त केलं आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवायचा याबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी महसूल विभागाला आदेश दिले की, आयात केलेले ऑक्सिजन आणि त्यासंबंधी उपकरणांना देशात तात्काळ मंजुरी द्यावी. त्याचबरोबर आयात केलेल्या लसींवरील बेसिक सीमाशुल्क पुढील तीन महिन्यांसाठी माफ करण्यात यावं.

    यावेळी मोदींनी सर्व मंत्रालये आणि विभागांना ऑक्सिजन आणि वैद्यकीय सुविधांच्या तात्काळ पुरवठ्याबाबत एकमेकांच्या कामांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी हे निश्चित करण्यात आलं की, ऑक्सिजन आणि ऑक्सिजनसंबंधी इतर उपकरणांच्या आयातीवरील बेसिक सीमाशुल्क आणि आरोग्य उपकर पुढील तीन महिन्यांसाठी तात्काळ प्रभावानं सूट देण्यात यावी, असे आदेशही दिले.

    या वस्तू व उत्पादनांवरील आयात शुल्क आणि आरोग्य उपकर माफ करण्यात आला आहे…


    भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींद्वारे लसीकरण केलं जात आहे. या दोन्ही लसी देशांतर्गत तयार होतात. त्याशिवाय भारतानं रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्याही आपत्कालीन वापराल मंजुली दिली आहे. त्यामुळं या लसीचे जवळपास 20 कोटी डोस हैदराबादमध्ये तयार केले जाणार आहेत.

    Central Government decided to full exemption to basic custom duty and health cess on import of Oxygen

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य