• Download App
    केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना मिळणार बुलेटप्रुफ जॅकेट, बीएसआय मानांकित लेव्हल ५ जॅकेटची भारतात निर्मिती|Central Armed Police Force to get bulletproof jacket, production of BSI standard Level 5 jacket in India

    केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना मिळणार बुलेटप्रुफ जॅकेट, बीएसआय मानांकित लेव्हल ५ जॅकेटची भारतात निर्मिती

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विविध कामगिऱ्यांत जीव धोक्यात घालणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना आता बीएसआय मानांकित लेव्हल फाईव्ह बुलेटप्रुफ जॅकेट मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आत्मनिर्भर भारतच्या नाऱ्यामुळे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या या जॅकेटची निर्मिती करणे शक्य झाले आहे.Central Armed Police Force to get bulletproof jacket, production of BSI standard Level 5 jacket in India

    कर्तव्यावर तैनात असलेल्या केंद्रीय सशस्त्र दलाच्या जवानांना अनेक धोकादायक ठिकाणी काम करावे लागते. नक्षलग्रस्त भाग, जम्मू-काश्मीर येथे लढणाºया जवानांना त्यांच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रुफ जॅकेट पुरवले जातात. सध्या ही जॅकेट अमेरिकेच्या न्याय विभागाची संशोधन, विकास आणि मूल्यमापन संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ जस्टिस (एनआयजे) द्वारे मानांकित करण्यात येतात.



    गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियोजित वेळापत्रकानुसार २३ सप्टेंबरपर्यंत सशस्त्र दलांना भारताची राष्ट्रीय मानक संस्था बीआयएसकडून प्रथमच प्रमाणपत्र देऊन सुमारे 4,000 बुलेटप्रुफ जॅकेटचा नवीन संच प्रदान केला जाणार आहे. बीआयएस कायदा 2016 अंतर्गत मानकीकरण, चिन्हांकन आणि गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी ही संस्था सुरू करण्यात आली आहे.

    सुरक्षित विश्वासार्ह दर्जेदार वस्तूंना प्रमाणित करणे, ग्राहकांसाठी आरोग्याचे धोके कमी करणे, निर्यात पर्यायांना प्रोत्साहन देणे; मानकीकरण, प्रमाणन आणि चाचणीद्वारे वस्तूंच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे हे काम ही संस्तथा करते.आता सशस्त्र दलांना पुरविण्यात येणाºया बुलेटप्रुफ जॅकेटची गुणवत्ता लेव्हल ५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

    सध्या सशस्त्र दले लेव्हल -४ बुलेटप्रुफ जॅकेट वापरतात. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो-तिबेटीयन सीमा पोलीस (आयटीबीपी), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी), आसाम रायफल्स (एआर) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) यांचा यामध्ये समावेश आहे.

    आयआयटीबीपी आणि एसएसबी यांना बीआयएस प्रमाणपत्र असलेले अपग्रेडेड बुलेटप्रुफ जॅकेट प्रथम मिळणार आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयटीबीपी आणि एसएसबीला २३ सप्टेंबरपर्यंत 4,000 लेव्हल -5 बीआयएस हॉलमार्क बीआर (बुलेट रेझिस्टन्स) जॅकेटसचे संच दिले जाणार आहेत.

    या जॅकेटमध्ये हार्ड स्टिल कोअर बुलेटसना अडविण्याची क्षमता आहे. ही बुलेटप्रुफ जॅकेट वजनाने हलकी असून बुलेटपासून संरक्षण करण्याची त्यांची क्षमता चांगली आहे. प्रत्येक जॅकेटची अंदाजे किंमत ४० ते ४५ हजार रुपये असणार आहे.

    Central Armed Police Force to get bulletproof jacket, production of BSI standard Level 5 jacket in India

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते