- बूस्टर किंवा प्रीकॉशन डोस सीआरपीएफ जवानांच्या दृष्टीने अधिक महत्वाचा मानला जात आहे. Central Armed Police Force personnel will get booster dose from January 10
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आता लवकरच पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.त्याच पार्श्वभूमीवर, फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत समावेश करून निवडणूक कर्मचाऱ्यांनाही बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.निवडणुकांवेळीही सीआरपीएफचे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले जातात.
दरम्यान केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (सीएपीएफ) जवानांचा समावेश फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आला आहे.त्यामुळे त्या जवानांनाही १० जानेवारीपासून करोनालसींचे बूस्टर डोस मिळणार आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB)ही केंद्रीय सशस्त्र दले आहेत.त्या दलांचे जवानही तिसऱ्या डोससाठी पात्र आहेत.बूस्टर किंवा प्रीकॉशन डोस सीआरपीएफ जवानांच्या दृष्टीने अधिक महत्वाचा मानला जात आहे.त्या दलावर देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे.
Central Armed Police Force personnel will get booster dose from January 10
महत्त्वाच्या बातम्या
- फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मरणोपरांत रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर ; पत्नी फेड्रिक सिद्दीकीने स्वीकारला पुरस्कार
- CM LETTER TO GOVERNOR : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्रातील सूर धमकीवजा; राज्यपाल कोश्यारी दुखावले
- काश्मीरमध्ये चकमकीत; जैश-ए-मोहम्मदचे सहा दहशतवादी ठार; दोन ठिकाणी कारवाई