• Download App
    अठरा वर्षा पर्यंतच्या सर्वांवर आता मोफत शस्त्रक्रिया केंद्र आणि राज्य सरकारच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियान Central and state government Health Scheme.

    अठरा वर्षापर्यंतच्या सर्वांवर आता मोफत शस्त्रक्रिया केंद्र आणि राज्य सरकारच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियान

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीने आरोग्यविषयक अनेक योजना सध्या राबवल्या जात आहेत. यामध्येच सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियान आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या ही लक्षणीय असून , येणारी पिढी हे देशाचं भविष्य आहे . त्यामुळे ही पिढी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त रहावी या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारने राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियान राबवायला सुरुवात केली आहे. Central and state government Health Scheme.

    यामध्ये शून्य ते अठरा वयोगटातील सर्वच बालकांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत . या शस्त्रक्रिया मध्ये हृदय, न्यूरो, आधी शस्त्रक्रियांचा समावेश असणार आहे . राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियान अंतर्गत पुण्यामध्ये काशीबाई नवले हॉस्पिटल तर पिंपरी चिंचवड मध्ये आदित्य बिर्ला हॉस्पिटल मध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया होणार आहेत. याबाबतचा करार राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने नुकताच केला असल्याचं सांगितलं आहे.


    केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅब्लेट, कॉम्प्युटरवरील बंदी पुढे ढकलली, आता या तारखेपासून लागू होणार निर्बंध


    या अभियानामुळे समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. लाखो रुपये खर्चून होणाऱ्या या शस्त्रक्रिया आता मोफत होत असल्याने पालकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे .
    या करारानुसार शून्य ते अठरा वयोगटातील बालकांना या नेमून दिलेल्या दोन हॉस्पिटलमध्ये हृदयरोगसर्जरी, अस्थिरोग शस्त्रक्रिया, दातांची शल्यचिकित्सा, कानाचे डोळ्याचे उपचार मोफत करता येणार आहेत.

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या परिसरातील आरबीएसके डॉक्टर किंवा जिल्हा रुग्णालयात चौकशी करता येणार आहे.  पुणे मुंबई नाशिक वर्धा या शहरात देखील या योजनेअंतर्गत उपचार करता येणार आहेत. मुंबई येथील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये या योजनेअंतर्गत उपचार करता येणार आहेत.

    Central and state government Health Scheme.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    दिल्ली मेट्रोशी तुलना करून न्यूयॉर्क मेट्रोची पोलखोल; सगळीकडे घाण, सांडपाणी आणि कचऱ्याने भरलेले डबे गोल!!

    Satara Suicide Case : सातारा आत्महत्या प्रकरणात महिलेचा आरोप- डॉक्टरने मुलीच्या बनावट पोस्टमॉर्टम रिपोर्टवर सही केली, नैसर्गिक मृत्यू दाखवला

    Election Commission : आज देशभरात SIRच्या तारखा जाहीर केल्या जातील; निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार