वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सध्या देशभरातस साखरेच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे. दरम्यान, याबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या जूनपासून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे जानकारांचे म्हणणे आहे. Center’s crackdown on sugar mills; Prohibition on production of ethanol from sugarcane; Decisions for rate control
जूनपासून इथेनॉल तयार करण्यावर बंदी
दरम्यान, याबाबत ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग देशातील साखरेचे उत्पादन, विक्री आणि उपलब्धता यावर लक्ष ठेवतो. ज्यामुळं स्थिर किंमतीवर साखरेची उपलब्धता सुनिश्चित होते.
सरकारनं 2023-24 या काळात साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना साखरेच्या रसापासून इथेनॉल बनवू नये असे आदेश दिले आहेत. हा आदेश तात्काळ लागू झाला आहे. परंतु बी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या आदेशांसाठी इथेनॉलचा पुरवठा सुरु राहणार आहे. या निर्णयाबाबत मंत्रालयाने पेट्रोलियम मंत्रालयालाही कळवले आहे.
भारत सरकार साखरेपासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनावर बंदी घालू शकते, अशा बातम्या येताच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भाव सुमारे 8 टक्क्यांनी घसरले आहेत. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे. साखरेचे भाव खाली येण्याची आता वर्तविली जात आहे.
Center’s crackdown on sugar mills; Prohibition on production of ethanol from sugarcane; Decisions for rate control
महत्वाच्या बातम्या
- मिचाँग चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकले; 100 हून अधिक ट्रेन, 50 उड्डाणे रद्द; चेन्नईत 12 जणांचा मृत्यू
- रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 7 डिसेंबरला शपथविधी, राहुल गांधींनी केले शिक्कामोर्तब
- सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग; भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!
- GOOD News : नवीन वर्षात शेतकऱ्यांची होणार चांदी, बँक खात्यात जमा होणार 5000 रुपये!