• Download App
    राम जन्मभूमी निकालानंतर सर्वोत्तम वाईन मागवून केले सेलीब्रेशन, माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी केला खुलासा|Celebration by ordering best wine after Ram Janmabhoomi verdict, former Chief Justice Ranjan Gogai revealed

    राम जन्मभूमी निकालानंतर सर्वोत्तम वाईन मागवून केले सेलीब्रेशन, माजी सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी केला खुलासा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अयोध्येतल्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल देण्यात आला होता. या निकालानंतर आपण आपल्या सहकाऱ्यांसह ताज हॉटेल मानसिंगमध्ये रात्रीचं जेवण घेतलं होतं, तसंच सर्वोत्तम वाईन मागवून सेलिब्रेशन केलं होतं, असा खुलासा माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केला आहे.Celebration by ordering best wine after Ram Janmabhoomi verdict, former Chief Justice Ranjan Gogai revealed

    त्यांनी आपल्या जस्टीस फॉर द जज या आत्मचरित्रात आपल्या व्यावसायिक आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांबद्दल खुलासा केला आहे. यात २०१८ मध्ये ४ वरिष्ठ न्यायाधीशांची झालेली पत्रकार परिषद, गोगोई यांच्यावर लावण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप ते त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातल्या कार्यकाळाबद्दल अनेक गोष्टींचा उल्लेख आहे.



    भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी ९ नोव्हेंबर २०१९ रोजी रामजन्मभूमीबाबत निकाल दिला होता. त्यांनी म्हटले आहे की, अयोध्या खटला त्यांच्या आत्तापर्यंतच्या व्यावसायिक आयुष्यातला एक महत्त्वाचा खटला होता.

    निकालानंतर सरचिटणीसांनी अशोक चक्राच्या खाली न्यायालय क्रमांक १ च्या बाहेर न्यायाधीशांच्या गॅलरीत फोटो काढण्यासाठी बोलावलं होतं. संध्याकाळी मी खंडपीठाच्या सर्व न्यायाधीशांना ताज मानसिंग हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो.

    आम्ही चायनीज फूड खाल्ले आणि तिथे असलेल्या सर्वोत्तम वाईनचा आस्वाद घेतला.तत्कालीन सरन्यायाधीश गोगोई यांच्या नेतृत्वाखालील, अयोध्येचा निकाल देणाºया पाच न्यायाधीशांच्या घटनापीठात न्या. एस. ए बोबडे आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस अब्दुल नझीर यांचा समावेश होता.

    न्यायमूर्ती अकिल कुरेशी यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याच्या शिफारशी मागे घेण्याच्या आणि त्रिपुरा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती करण्याच्या कॉलेजियमच्या निर्णयावर, गोगोई लिहितात की तो निर्णय संवैधानिक संस्थांमधील संघर्ष टाळण्यासाठी महत्त्वाचा होता.

    Celebration by ordering best wine after Ram Janmabhoomi verdict, former Chief Justice Ranjan Gogai revealed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र