• Download App
    CDS Bipin Rawat : देशातले पहिले सीडीएस बिपीन रावत ! गोरखा बटालियनपासून सुरुवात -३७ वर्ष देशसेवा...वाचा सविस्तर… । CDS Bipin Rawat: The first CDS Bipin Rawat in the country! Beginning with Gorkha Battalion - 37 years of national service ... Read more

    CDS Bipin Rawat : देशातले पहिले सीडीएस बिपीन रावत ! गोरखा बटालियनपासून सुरुवात -३७ वर्ष देशसेवा…वाचा सविस्तर…

    सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक आहेत. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे आहे. CDS Bipin Rawat: The first CDS Bipin Rawat in the country! Beginning with Gorkha Battalion – 37 years of national service … Read more


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये बुधवारी एक मोठा अपघात झाला आणि लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी तसेचअनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते आणि ते एका कार्यक्रमात सहभागी होणार होते. अपघातानंतर तिघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, लष्कराच्या बाजूने अद्याप कोणतीही खात्री करण्यात आलेली नाही.

    बिपिन रावत (Bipin Rawat) हे देशातील पहिले CDS अधिकारी म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. सीडीएसचे काम लष्कर (Army), हवाई दल (Air Force) आणि नौदल (Navy) यांच्यात समन्वय साधणे आहे. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक आहेत. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे आहे.

    बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एलएस रावत हेदेखील लष्करात होते आणि ते लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून ओळखले जात होते. त्यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यातल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीत प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र मिळालं, ज्याला SWORD OF HONOURनं सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.



    विविध पदांवर काम

    बिपिन रावत अमेरिकेतून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना 16 डिसेंबर 1978 रोजी यश मिळाले. त्यांना गोरखा 11 रायफल्सच्या 5व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. इथे रावत यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. रावत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, की गोरखामध्ये राहून त्यांना जे काही शिकता आले ते इतरत्र कुठंही शिकायला मिळालं नाही. इथं त्यांनी लष्कराची धोरणं समजून घेतली आणि धोरणं तयार करण्याचं कामही केलं. इथं त्यांनी लष्कराच्या अनेक पदांवर क्रॉप्स, जीओसी-सी, दक्षिण कमांड, आयएमए देहरादून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट लॉजिस्टिक्स स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवर काम केलं.

    पदकं आणि सन्मान

    सैन्यात असताना बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत जनरल रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

    आयुष्यातील ३७ वर्षे लष्करासाठी समर्पित

    आता त्यांच्याकडे आणखी अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि आता ते देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी एक आहेत. बिपिन रावत म्हणतात, की त्यांनी एकट्याने काहीही केलं नाही. टीम वर्कमुळेच यश मिळालं. त्यांनी गोरखा बटालियनपासून सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सैन्यात अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्करप्रमुख झाले, आता त्यांची भारतातील पहिली सीडीएस अधिकारी म्हणूनही नियुक्ती झालीय.

    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये 14 लोक होते आणि त्यात एक वरिष्ठ अधिकारी सामील होता. अपघातानंतर तिघांना वाचवण्यात यश आले असून सध्या बचावकार्य सुरू आहे. सध्या लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे, मात्र आतापर्यंत कोणत्या लोकांना वाचवण्यात आले आहे, याची माहिती लष्कराकडून देण्यात आलेली नाही.

    CDS Bipin Rawat: The first CDS Bipin Rawat in the country! Beginning with Gorkha Battalion – 37 years of national service … Read more

    Related posts

    Bihar : बिहारच्या बेतिया पोलिस लाईनमध्ये कॉन्स्टेबलने सहकारी सैनिकावर ११ गोळ्या झाडल्या

    Rahul Gandhi भारतात नेहरुंचे री ब्रँडिंग करून राहुल गांधी अमेरिकेत; सॅम पित्रोदांकडून जोरदार स्वागत!!

    Malegaon : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल न्यायालयाने ठेवला राखून