विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सीबीएसईच्या बारावी बोर्डाचा निकाल ३१ जुलैला तर दहावीचा २० जुलैला रोजी जाहीर करण्यात येईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता जाहीर करण्यात येणाऱ्या निकालाचे प्रारूप तयार केले आहे.CBSC result will declares on 31 july
यानुसार विद्यार्थ्यांनी दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्षांमध्ये मिळविलेल्या गुणांच्या सरासरीवर त्यांच्या बोर्डाच्या गुणांचे मूल्यांकन करण्यात येईल.‘सीबीएसई’ने १२ सदस्यांची एक तज्ञ समिती नेमून मूल्यांकनाचे ३०: ३०: ४० अशा गुणांच्या धर्तीचे प्रारूप तयार केले आहे.
ॲटर्नी जनरल के. के वेणुगोपाल यांनी आज ते न्यायालयासमोर ते सादर केले.आयसीएसई बोर्डाच्या परीक्षांचे निकाल निश्चित करताना प्रत्येक विद्यार्थ्याची गेल्या ६ वर्षांची कामगिरी गृहीत धरून त्या आधारावर त्याचा निकाल जाहीर केला जाईल,
असे केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले. ‘सीबीएसई’च्या वतीने नवे मूल्यांकन निकष लवकरच अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील.
CBSC result will declares on 31 july
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या उगमाच्या शोधासाठी अमेरिकेकडील जैवअस्त्रांशी तपासणी करा, चीनची मागणी
- भाजपच्या दुतासारखे वागतात पश्चिम बंगालचे राज्यपाल, आता डाव्या पक्षांचीही टीका
- ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका, बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ
- महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या सहा लाखांपर्यंत पोहोचण्याची तज्ञांची भिती
- मंत्र्यांनी निर्णय घ्यावेत, आंदोलनाची गरज काय?, ओबीसी आरक्षणासाठी पंकजा मुंडे पुढे सरसावल्या; २६ जूनला चक्काजाम आंदोलन
- राज्यात परिचारिकांचे २१ जूनपासून आंदोलन, मागण्या मान्य न बेमुदत संपांचा इशारा