• Download App
    तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जींना CBIने बजावले समन्स; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?CBI sent summon to the TMC National General Secretary Abhisekh Banerjee

    तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जींना CBIने बजावले समन्स; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

    कोलकाता येथील निजाम पॅलेसमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : केंद्रीय गुन्हे अन्वेशनने तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना आज (सोमवार) शिक्षण भरती घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. त्यांनी उद्या म्हणजेच मंगळवारी कोलकाता येथील निजाम पॅलेसमध्ये हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. CBI sent summon to the TMC National General Secretary Abhisekh Banerjee

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांना शिक्षक भरतीतील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या चौकशीला स्थगिती दिल्यानंतर काही तासांनंतर त्यांना सीबीआयचे समन्स प्राप्त झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जाणारे तृणमूल नेते अनुब्रता मंडल यांना याच प्रकरणात गेल्या वर्षी जुलैमध्ये अटक करण्यात आली होती.

    सीबीआयने अभिषेक बॅनर्जी यांना समन्स बजावल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. कारण आतापर्यंत विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत आलेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआयने कालच दिल्लीच्या नवीन मद्य धोरणात कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी केली आहे.

    CBI sent summon to the TMC National General Secretary Abhisekh Banerjee

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी