प्रतिनिधी
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्या घरासह 7 ते 8 ठिकाणांवर सीबीआयच्या पथकाने छापे घातले हे छापे अजूनही सुरू आहेत. नेमके किती वेळा छापे घातले ते मी मोजायचे विसरूनही गेलो आहे, आहे, असे खोचक वक्तव्य कार्ती चिदंबरम यांनी केले आहे. पण सीबीआय सारखी केंद्रीय तपास संस्था असे अनेक ठिकाणी छापे घालते त्याचे नेमके रहस्य काय?? चिदंबरम आणि कार्टी चिदंबरम यांची नेमकी केस काय?? हे पाहणे महत्त्वाचे आहे. CBI raids Chidambaram’s 8-9 places; But what exactly is the case
सीबीआयच्या पथकाने कार्ती यांच्या घर आणि ऑफिसशिवाय अनेक ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबई आणि तामिळनाडूमधील कार्तीच्या घरांवर हा छापे घालण्यात आले आहेत.
या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, असे किती वेळा झाले, मी मोजणी विसरलो आहे. त्यांनी पुढे लिहिले की, हा छापा नोंदवला गेला पाहिजे.
305 कोटींचे प्रकरण
कार्ती चिदंबरम यांच्यावर एअरसेल-मॅक्सिस डील आणि INX मीडियाला 305 कोटी रुपयांचा विदेशी निधी मिळविण्यासाठी विदेशी गुंतवणूक मंडळाच्या मंजुरीशी संबंधित अनेक गुन्हेगारी खटल्यांचा सामना करावा लागत आहे. हा परदेशी निधी त्यांचे वडील पी. चिदंबरम गृहमंत्री असताना त्यांना मिळाला असल्याचे सांगितले जात आहे.
परकीय निधी नियंत्रण कायद्यात फक्त आयएएक्स मीडियाला निधी मिळविण्या पुरतीच सवलत देण्यासाठी नियमावली बदलली. निधी आयएनएक्स मीडियाच्या खात्यात जमा झाला आणि पुन्हा नियमावली मूळ स्वरूपात बदलून टाकली, असा हा आरोप आहे.
– काय आहे INX मीडिया केस?
सीबीआयने 15 मे 2017 रोजी आयएनएक्स मीडिया या मीडिया कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. INX मीडिया समूहाने विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (FIPB) च्या मान्यतेमध्ये 305 कोटी रुपयांचा विदेशी निधी मिळवण्यासाठी नियमावली बदलण्या बरोबरच विविध अनियमितता केल्याचा आरोप आहे. 2007 मध्ये जेव्हा कंपनीला गुंतवणूक देण्यात आली तेव्हा पी. चिदंबरम हे अर्थमंत्री होते.
CBI raids Chidambaram’s 8-9 places; But what exactly is the case
महत्वाच्या बातम्या
- ज्ञानवापीत शिवलिंग : सह कोर्ट कमिशनर विशाल सिंह यांचा रिपोर्ट तयार!!
- CBI Raids : कार्ती चिदंबरम यांच्यात तीन ठिकाणांवर सीबीआयचे छापे; कार्ती म्हणाले, मी मोजायचे सोडून दिलेत!!
- काँग्रेसचे चिंतन : एकीकडे राष्ट्रवादीचा धोका; तर दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नव्यांना मोका!!
- ज्ञानवापीत शिवलिंग : 1991 च्या प्रार्थनास्थळ कायद्याचा मुस्लिम पक्षाला आधार; पण सेक्शन 4 (3) मध्ये अपवाद!!