• Download App
    RG Kar Hospital आरजी कर हॉस्पिटलच्या माजी प्राचार्याविरुद्ध

    RG Kar Hospital : आरजी कर हॉस्पिटलच्या माजी प्राचार्याविरुद्ध CBIने केला मोठा दावा, म्हटले…

    RG Kar Hospital

    सीबीआयने एफआयआर नोंदवून माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा तपास सुरू केला आहे


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : कोलकाता ( Kolkata ) येथील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयला आरजी कर मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तपासात पुरेसे पुरावे सापडले आहेत. खुद्द सीबीआयनेच हा खुलासा केला आहे. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भ्रष्टाचार प्रकरणात बरेच पुरावे मिळाले आहेत.

    उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने शनिवारी एफआयआर नोंदवून माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा तपास सुरू केला आहे. यापूर्वी कोलकाता पोलिसांची एसआयटी आर्थिक अनियमिततेचा तपास करत होती. हॉस्पिटलचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी डॉ. घोष यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि अनैतिक वर्तनाचा आरोप करणारी याचिका दाखल केली होती.



    सीबीआयला 17 सप्टेंबरला तपासाचा प्रगती अहवाल सादर करायचा आहे. तत्पूर्वी, सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ चाचणी केली.

    केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार आणि इतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी श्यामबाजार येथे या घटनेचा निषेध केला. दरम्यान, पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथील परिमल डे या शिक्षकाने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या घटनेवर राज्य सरकारच्या प्रतिक्रियेमुळे पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 मध्ये, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी परिमल डे यांना बंग रत्न पुरस्काराने सन्मानित केले.

    CBI made a big claim against former principal of RG Kar Hospital, said…

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य