• Download App
    सीबीआयकडून दुसऱ्या दिवशी वानखेडेंची पुन्हा 6 तास चौकशी, शाहरुख खानला कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप|CBI interrogates Wankhede again for 6 hours the next day, Shah Rukh Khan accused of demanding 25 crores in Cardelia Cruz drugs case

    सीबीआयकडून दुसऱ्या दिवशी वानखेडेंची पुन्हा 6 तास चौकशी, शाहरुख खानला कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप

    वृत्तसंस्था

    मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) माजी झोनल चीफ समीर वानखेडे यांची सीबीआय कार्यालयात सलग दुसऱ्या दिवशी 6 तास चौकशी करण्यात आली. समीर वानखेडे सकाळी 10.30 वाजता सीबीआय कार्यालयात गेले, ते सायंकाळी 5 वाजता बाहेर आले.CBI interrogates Wankhede again for 6 hours the next day, Shah Rukh Khan accused of demanding 25 crores in Cardelia Cruz drugs case

    ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणात अडकलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्या सुटकेच्या बदल्यात 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप वानखेडेंवर आहे. याआधी शनिवारीही त्यांची सुमारे 5 तास चौकशी करण्यात आली होती.



    सीबीआयने 18 मे रोजी समीर यांना चौकशीसाठी बोलावले होते, मात्र ते हजर झाले नाहीत. सीबीआयच्या समन्सविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती, मात्र तेथून त्यांना फारसा दिलासा मिळाला नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने समीर यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.

    मुंबई हायकोर्टात म्हणाले- सीबीआय बदला घेत आहे

    समीर यांनी 19 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. समीर यांनी दावा केला की, माझ्यावर सूडाच्या भावनेने कारवाई केली जात आहे. यापूर्वीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तेव्हाही पुरावा मिळाला नाही. सीबीआयलाही पुरावे मिळणार नाहीत.

    वानखेडेंवर 22 मेपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

    शाहरुखशी व्हॉट्सअॅप चॅट हायकोर्टात सादर

    आर्यन ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) माजी झोनल चीफ समीर वानखेडे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात शाहरुख खानशी मोबाइलवर केलेल्या चॅट्स कोर्टात सादर केल्या. यामध्ये शाहरुख आपल्या मुलाला तुरुंगात टाकू नका, अशी विनवणी वानखेडेंकडे करत आहे. समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या कारवाईबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

    CBI interrogates Wankhede again for 6 hours the next day, Shah Rukh Khan accused of demanding 25 crores in Cardelia Cruz drugs case

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!