• Download App
    MP Karti Chidambaram काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्य

    MP Karti Chidambaram : काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध CBIकडून गुन्हा दाखल

    MP Karti Chidambaram

    १५,००० अमेरिकन डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप


    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : MP Karti Chidambaram केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. कार्ती चिदंबरम यांच्यावर चिनी कामगारासाठी बेकायदेशीरपणे भारतीय व्हिसा मिळवणे आणि अॅडव्हांटेज स्ट्रॅटेजिक प्रायव्हेट लिमिटेडला १५,००० अमेरिकन डॉलर्स (१२.८८ लाख रुपये) लाच देणे या आरोपांची चौकशी सुरू आहे.MP Karti Chidambaram

    २०१८ मध्ये, सीबीआयने कार्ती, अॅडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड, एस भास्कररमन आणि अज्ञात लोकांविरुद्ध एफआयपीबी म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल प्रमोशन बोर्ड प्रकरणात प्राथमिक चौकशी सुरू केली होती. तपासात असे आढळून आले की डियाजियो स्कॉटलंड आणि सेक्वॉइया कॅपिटल्सने अॅडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या खात्यात गुप्तपणे निधी हस्तांतरित केला होता. यानंतर नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



     

    अ‍ॅडव्हांटेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड ही तीच कंपनी आहे जी आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय आणि ईडीच्या रडारवर होती आणि चिनी कामगारांना बेकायदेशीरपणे भारतीय व्हिसा मिळवून देण्यातही या कंपनीचे नाव पुढे आले होते.

    २०१८ मध्ये, कार्ती चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली आणि नंतर कार्ती यांचे वडील आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सीबीआय आणि ईडीने अटक केली होती. सीबीआयने आरोप केला आहे की कार्ती चिदंबरम यांच्याशी डायजिओ स्कॉटलंडने संपर्क साधला होता आणि बंदी उठवण्यासाठी कार्ती चिदंबरम आणि एस भास्कररमन यांच्या नियंत्रणाखालील अॅडव्हांटेज स्ट्रॅटेजिक प्रायव्हेट लिमिटेडला १५,००० अमेरिकन डॉलर्स (१२.८८ लाख रुपये) दिले होते. डिएगो स्कॉटलंड कंपनी जॉनी वॉकर भारतात आयात करते. भारतात आयातित शुल्कमुक्त दारू विकणाऱ्या आयटीडीसीने २००५ मध्ये शुल्कमुक्त उत्पादने विकण्यासाठी डियाजियोची निवड केली, ज्यामुळे जॉनी वॉकर व्हिस्कीच्या विक्रीत ७० टक्के घट झाली.

    CBI files case against Congress MP Karti Chidambaram

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार