विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला आहे.CBI enqiry in Mahant case
केंद्र सरकारने त्यासाठी मंजुरी दिल्यानंतर अधिसूचना जारी करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारतर्फे तशी विनंती करण्यात आली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तशी सूचना केली होती.
बाघम्बरी मठात सोमवारी नरेंद्रगिरी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी दुसऱ्या दिवशी १८ सदस्यांचे विशेष तपास पथक तयार केले होते. मात्र विरोधी पक्षांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.
गेले तीन दिवस साऱ्या राज्यात या प्रकरणावरून उलट सुलट चर्चा सुरु होती. अखेर राज्य सरकारने महंत नरेंद्रगिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे.
CBI enqiry in Mahant case
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील निर्बंध ऑक्टोबरपासून शिथिल; पालकमंत्री अजित पवार यांचे कोरोना आढावा घेतल्यावर संकेत
- सबका साथ, सबका विकास, आत्मनिर्भरता, स्टार्ट अप्स, स्किल डेव्हलपमेंट संकल्पनांची मूळे दीनदयाळजींच्या “सबको काम” अर्थनीती मध्ये!!
- मार्क्सवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले, त्यांच्यावर कधी सोडली का सीबीआय!!; ममतांचा भाजपला टोला
- WOMEN IN NDA : एनडीए प्रवेशासाठी UPSC ने महिला उमेदवारांकडून मागविले अर्ज