• Download App
    करदात्यांना सीबीडीटीचा दिलासा, सहा प्रकारचे फॉर्म आणि स्टेटमेंट भरण्याची मुदत वाढविली|CBDT relief to taxpayers, extended deadlines for filling up six types of forms and statements

    करदात्यांना सीबीडीटीचा दिलासा, सहा प्रकारचे फॉर्म आणि स्टेटमेंट भरण्याची मुदत वाढविली

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना दिलासा देत सहा प्रकारचे फॉर्म आणि स्टेटमेंट भरण्यास मुदतवाढ दिलीआहे. प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत काही फॉर्म भरण्याची मुदत वाढवली आहे.  सीबीडीटीने एक परिपत्रक जारी करून ही घोषणा केली. यामध्ये 15सीसी, इक्वलायझेशन लेव्ही स्टेटमेंट यांसारख्या फॉर्मचा समावेश आहे.CBDT relief to taxpayers, extended deadlines for filling up six types of forms and statements

    इलेक्ट्रॉनिक पद्धतीने हे फॉर्म भरताना करदाते आणि इतर भागधारकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने यापूर्वी अधिकृत डीलर्ससाठी आयकर फॉर्म 15सी आणि 15सीबी सादर करण्याची मुदत वाढवली होती. हे दोन्ही फॉर्म इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरणे आवश्यक आहेत.



    30 जून, 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अधिकृत डीलरने सादर केलेल्या फॉर्म क्रमांक 15सीसीमध्ये त्रैमासिक विवरण 15 जुलै रोजी किंवा त्यापूर्वी दाखल करावे लागेल, परंतु सीबीडीटीने यात दिलासा देत 31 आॅगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे.  आर्थिक वर्ष 2020-21 साठी फॉर्म क्रमांक 1 मध्ये इक्वलायझेशन लेव्ही स्टेटमेंट दाखल करण्याची अंतिम तारीख 30 जून होती.  त्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली होती. आता पुन्हा एकदा त्याची मुदत 31 आॅगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.

    फॉर्म क्रमांक 64-डीमध्ये गुंतवणूक निधीद्वारे जमा किंवा भरलेल्या उत्पन्नाचा तपशील सादर करण्याची अंतिम मुदत 15 जून होती. ही मुदत आता 15 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ते आयकर नियम 12 सीबीअंतर्गत सादर करावे लागेल.

    2020-21 या आर्थिक वर्षांसाठी फॉर्म क्रमांक 64-सीची अंतिम मुदत आधी 30 जूनपर्यंत निश्चित करण्यात आली होती. ती 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत भारतात केलेल्या प्रत्येक गुंतवणुकीसंदर्भात पेन्शन फंडाने केलेले स्टेटमेंट 31 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करायचे होते.

    आता त्याची मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.  फॉर्म 2 एसडब्ल्यूएफमध्ये एक सार्वभौम संपत्ती निधीद्वारे केलेल्या गुंतवणुकीसंदर्भात 31 जुलै 2021 रोजी किंवा त्यापूर्वी स्टेटमेंट सादर करणे आवश्यक होते. आता सीबीडीटीने दिलासा देत त्याची मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.

    CBDT relief to taxpayers, extended deadlines for filling up six types of forms and statements

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य