• Download App
    CBDT चा कोरोना रुग्णांना मोठा दिलासा, आता रुग्णालयांना देता येईल 2 लाखांहून अधिक रकमेचे रोख पेमेंट । CBDT allows cash payment of over rs 2 lakh for covid 19 treatment at hospitals

    CBDT चा कोरोना रुग्णांना मोठा दिलासा, आता रुग्णालयांना देता येईल 2 लाखांहून अधिक रकमेचे रोख पेमेंट

    CBDT : खासगी रुग्णालये, कोविड केंद्रे, दवाखाने, नर्सिंग होमसह सर्व वैद्यकीय केंद्रे आता दोन लाख रुपयांहून अधिक रकमेची पेमेंट रोखीने घेऊ शकतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ही सूट दिली आहे. ही सूट 31 मेपर्यंत लागू असेल. परंतु रोख भरणा मर्यादा निश्चित केलेली नाही. CBDT allows cash payment of over rs 2 lakh for covid 19 treatment at hospitals


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : खासगी रुग्णालये, कोविड केंद्रे, दवाखाने, नर्सिंग होमसह सर्व वैद्यकीय केंद्रे आता दोन लाख रुपयांहून अधिक रकमेची पेमेंट रोखीने घेऊ शकतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ही सूट दिली आहे. ही सूट 31 मेपर्यंत लागू असेल. परंतु रोख भरणा मर्यादा निश्चित केलेली नाही.

    खरं तर, आयकर कायद्याच्या कलम 269- ST मध्ये देशातील कोणत्याही व्यक्तीला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करण्यास मनाई आहे. 2017 मध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी सरकारने हा नियम बनविला. या नियमानुसार, एखाद्याला दोन लाख रुपयांहून अधिक रकमेचा व्यवहार करायचा असेल तर तो केवळ चेक, ड्राफ्ट, नेटबँकिंग किंवा डिजिटल मार्गाने करता येईल.

    हा कलम हटवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मनीषा गुप्ता यांनी याचिका दाखल केली होती. त्या म्हणाल्या की, रुग्णालये दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेत नाहीत, त्यामुळे रुग्णांच्या उपचारांना उशीर होण्यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. सुनावणीदरम्यान सरकारने म्हटले होते की, सरकार या नियमात सूट देण्याचा विचार करत आहे.

    यानंतर सीबीडीटीकडून आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार खासगी रुग्णालये, कोविड केअर सेंटर, नर्सिंग होम यासह सर्व वैद्यकीय केंद्रे जेथे कोरोना रुग्णांवर उपचार होत आहेत तेथे आता दोन लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम भरता येणार आहे. हा आदेश 31 मेपर्यंत लागू राहील. 1 मेपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. तथापि, अद्याप रोख भरणा मर्यादेबाबत निर्णय झालेला नाही.

    दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेसाठी आधार कार्ड किंवा पॅनकार्ड द्यावे लागेल, असे या आदेशात म्हटले आहे. आदेशानुसार, रुग्णाची पॅन किंवा बिल देणाऱ्याचा आधार, रुग्ण आणि देयकर्त्याचे नातेसंबंधांची माहिती घेतल्यास रुग्णालय दोन लाख रुपयांहून अधिक रोख रक्कम स्वीकारू शकतील. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा निर्णय रुग्णालयात दाखल कोरोना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना पेमेंटबाबत येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी घेण्यात आला आहे.

    CBDT allows cash payment of over rs 2 lakh for covid 19 treatment at hospitals

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र