वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या संघटनेने केंद्रातल्या मोदी सरकारने आणलेल्या Waqf board सुधारणा बिलाला पाठिंबा दिला आहे, इतकेच काय पण केरळ मधल्या सर्वपक्षीय खासदारांना संघटनेने संबंधित बिलाला संसदेत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. Waqf Amendment Bill
कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या संघटनेने प्रसिद्ध केलेले पत्रक केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट केले. देशातली फार मोठी जमीन संपत्ती Waqf board ने परस्पर आपल्या ताब्यात घेऊन अनेक गोरगरिबांवर अन्याय केल्याची भावना बिशप कॉन्फरन्स व्यक्त केली.
त्याचबरोबर केरळमधील मुनंबम येथील 600 कोळी कुटुंबांच्या वंशपरंपरागत जमिनींवर आणि घरांवर तीन वर्षांपूर्वी Waqf board ने हक्क सांगितला, जो बेकायदा आहे. केरळ मधल्या सर्वपक्षीय खासदारांनी Waqf board सुधारणा बिलाला संसदेत पाठिंबा देऊन केरळ मधल्या कोळी कुटुंबांवरचा अन्याय दूर करावा, असेही कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्सने संबंधित पत्रकात नमूद केले आहे.
अजमेर शरीफ दर्ग्याचे प्रमुख सय्यद नसरुद्दीन चिस्ती यांनी देखील Waqf board सुधारणा बिलाला पाठिंबा दिला असून केंद्रातल्या मोदी सरकारने या बिलाच्या निमित्ताने अनेक गोरगरिबात गरिबांवरचा अन्याय दूर केल्याचे त्यांनी नमूद केले. “सौगात ए मोदी” या उपक्रमाचे देखील त्यांनी स्वागत केले.