देशात जात निहाय जनगणनेच्या राजकारणातून नितीश कुमार नवे विश्वनाथ प्रताप सिंह बनण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना एकाच वेळी हिंदुत्वाच्या राजकारणाला शह द्यायचा आहे, तर दुसरीकडे सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्या विरोधी ऐक्याच्या प्रयत्नांना खो घालायचा आहे आणि आपले राजकीय घोडे पुढे दामटायचे आहे. Caste census; Nitish Kumar trying to follow political footsteps of Vishwanath Pratap Singh`s Mandal commision politics
विनायक ढेरे
देशात जातनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे 11 पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले आहेत. सुरुवातीला नितीशकुमारांनी जातनिहाय जनगणना हा विषय लावून धरून काहीच दिवसांमध्ये आपल्याभोवती सर्वपक्षीय जमावडा तयार केला ही एक प्रकारची वेगळी राजकीय जोडणी आहे. नितीश कुमार यांनी अतिशय राजकीय चतुराईने ही मागणी पुढे रेटली आहे. याचे राजकीय टाइमिंग आणि या मागचे हेतू लक्षात घेतले तर एकापेक्षा अनेक राजकीय shots शॉर्ट्स आणि spots याच्यात दिसतात. वरवर पाहता ही मागणी social logical वाटते म्हणजे जातींची लोकसंख्या समजली की त्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींचे नेमके प्रमाण ठरवता येईल, याखेरीज देशाच्या social fabric चे वस्तुस्थितीदर्शक आकलन जात निहाय जनगणनेतून होईल, असा नितीश कुमार यांचा दावा आहे. या दाव्यात तथ्य जरूर आहे. परंतु ते तेवढेच तथ्य नाही, तर त्यात त्यापलीकडेही बऱ्याच गोष्टी यात जोडलेल्या आहेत. या मधला political angle अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे देशात हिंदुत्वाच्या राजकारणाचे व्यापक वातावरण असताना नितीश कुमार हे आपल्या राजकीय जीवनाच्या अंतिम पडावात “नवे विश्वनाथ प्रताप सिंह” बनायला निघाले आहेत हा आहे.
विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरीस ते पंतप्रधान बनले. त्यावेळी त्यांनी खेळलेला मंडल आयोगाचा डाव देशाच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम करून गेला. त्या वेळची political terminology लक्षात घेतली तर ते अधिक स्पष्ट होईल. त्यावेळी अनेक राजकीय विश्लेषकांनी भारतीय राजकारणात “मंडल विरुद्ध कमंडल” असे राजकारण सुरू असल्याचे म्हटले होते. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी यांची अयोध्या रथयात्रा जोरात होती. देशात हिन्दुत्वाचे वातावरण तयार होऊ लागले होते. त्याला छेद देण्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा डाव खेळल्याचे बोलले गेले.
आजच्या राजकीय परिस्थितीशी त्याचे साम्य आहे. आजही हिंदुत्वाचे राजकारण जोरावर आहे, दुसरीकडे काँग्रेस निष्ठ राजकारणाची घसरगुंडी वेगात सुरू आहे. अशा स्थितीत तिसऱ्या समर्थ पर्यायाची पोकळी देशाच्या राजकारणात जाणवत आहे. ही पोकळी भरून काढण्याचा नितीश कुमार यांचा प्रयत्न आहे. या दृष्टीनेच त्यांनी जात निहाय राजकारणाचा डाव टाकून बघितला आहे. त्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाचा प्रयोग करून पाहिला, यावेळी नितीश कुमार हे जातीनिहाय जनगणनेचा प्रयोग करू पाहात आहेत.
आजच्या नितीश कुमार यांच्या राजकीय डावात मात्र तेवढाच मुद्दा प्रभावी नाही, तर याखेरीज अन्य राजकीय मुद्द्यांची ही सरमिसळ यात आहे. देशात हिंदुत्वाचे राजकारण तर प्रभावी आहेच, पण त्याहीपेक्षा Modi Cult हा जास्त प्रभावी ठरला आहे. त्याला काटशह देण्याची जरुरत सर्वच विरोधकांना वाटते. परंतु त्यासाठी त्यांना प्रभावी तोड सापडत नाही, ही विरोधकांची समस्या आहे.
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधी आघाडीच्या प्रयत्नांमध्ये काहीसे सातत्य जरूर सापडत आहे. परंतु या दोघींचे प्रयत्न समांतर रेषेत सारखे पुढे चालले आहेत आणि त्यातही फक्त आणि फक्त “मोदी विरोध” हा एकमेव समान धागा आहे. बाकीचे सर्व राजकीय धागे हे वेगवेगळे किंबहुना परस्परविरोधी आहेत.
या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांच्या जात निहाय जनगणनेच्या राजकारणाकडे पाहिले, तर त्यातले वेगळेपण लक्षात येते. नितीश कुमार यांचे हे राजकारण त्यांच्या वैयक्तिक फायद्यापेक्षा देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे ठरू शकते. यात हिंदुत्वाच्या राजकारणाला काटशह तर आहेच, पण त्याचबरोबर हिंदुत्वाच्या राजकारणामुळे ज्या प्रादेशिक पक्षांचे जात निहाय राजकारण कायमचे संपुष्टात येऊ शकते त्या जात निहाय राजकारणाच्या पुनरुज्जीवननातून प्रादेशिक पक्षांना राजकीय संजीवनी देण्याचा हा प्रयत्न आहे. देशातल्या जवळजवळ प्रत्येक प्रादेशिक पक्षाचा सामाजिक आधार एक विशिष्ट प्रभावी जात हाच आहे हे स्पष्ट दिसते. राष्ट्रवादी काँग्रेस हे त्याचे ठळक उदाहरण आहे. “मराठ्यांचा पक्ष” ही या पक्षाची ओळख आहे. अशीच अवस्था बिहार, उत्तर प्रदेश मधल्या राजकीय पक्षांची आहे. दक्षिणेतल्या काही पक्षांची हीच गोष्ट आहे. आपापल्या प्रदेशातील प्रभावी जातींचा सामाजिक आधार घेऊन राजकारण करणे हे प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाचे स्वरूप आहे. या राजकारणाला नितीश कुमार यांच्या जात निहाय जनगणनेच्या मागणीतून आधार मिळू शकतो, असा त्यांचा होरा आहे. या अर्थाने नितीश कुमार हे “नवे विश्वनाथ प्रताप सिंह” बनायला निघाले आहेत, असे जाणवते.
अर्थात भारतीय राजकारणाची व्यामिश्रता एवढी जटील आहे, की नितीश कुमार यांच्या सारख्या अनुभवी नेत्यांचा होरा जसाच्या तसा अचूक ठरेल हे शक्य नाही. त्यांचा होराही चुकू शकतो आणि भारतीय राजकारण त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या वळणाने जाऊ शकते. परंतु एक गोष्ट मात्र यात निश्चित आहे, ती म्हणजे सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांचे प्रयत्न फक्त “मोदी विरोध” या आधारावर टिकवण्याचे प्रयत्न आहेत, तर नितीश कुमार यांचा प्रयत्न मात्र अधिक गंभीर आणि दूरगामी सामाजिक परिणाम करणारा ठरण्याची दाट शक्यता आहे.
Caste census ; Nitish Kumar trying to follow political footsteps of Vishwanath Pratap Singh`s Mandal commision politics
महत्त्वाच्या बातम्या
- माजी पंतप्रधान देवेगौडा म्हणाले, राहुल गांधींचा लोकांवर परिणाम होतोय की नाही, कल्पना नाही
- Farmer Protest : NH-24 सुरू होणार की नाही, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी, यूपी सरकारकडून शपथपत्र दाखल
- अयोध्येतील राम मंदिरापर्यंत जाणाऱ्या मार्गाला कल्याण सिंहांचे नाव, यूपीच्या 5 जिल्ह्यांत असेल ‘कल्याण सिंह’ मार्ग
- जर तुमच्याकडेही असेल 2 रुपयांचे ‘हे’ नाणे तर तुम्ही घरी बसून बनू शकता लखपती