वृत्तसंस्था
पाटणा : देशात जात निहाय म्हणजे सर्व जातींची जनगणना व्हावी या मागणीचा पुनरुच्चार बिहारचे मुख्यमंत्री संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी केला आहे. नितीश कुमार यांनी १५ दिवसांपूर्वी दिल्लीत संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी ही मागणी केली होती. त्यांनी जातीनिहाय जनगणनेच्या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. या पत्राचे उत्तर अद्याप आलेले नाही, अशी माहिती नितीश कुमार यांनी पाटण्यात पत्रकारांना दिली. Caste-based Census will help all castes to get their exact numbers, to create policies accordingly. It’s for the benefit of the country
देशातले जात वास्तव लक्षात घेता आरक्षणाची फेररचना करता यावी यासाठी जात निहाय जनगणना आवश्यक आहे. केंद्र सरकारने ती करावी ही आमची जुनी मागणी आहे, असे नितीशकुमार म्हणाले. प्रत्येक जातीला आपली प्रत्यक्ष संख्या समजल्यानंतर त्यानुसार विविध सोयी सवलती यांचे वाटप करता येऊ शकेल. यातून सामाजिक न्याय प्रस्थापित करता येईल, असे ते म्हणाले.
परंतु जातनिहाय जनगणना हा विषय क्लिष्ट विषय असून यात राजकीय आणि सामाजिक धागेदोरे गुंतलेले आहेत. अनेक जातींची नावे विविध राज्यांमध्ये वेगवेगळी आहेत. अनेक जातींचे राजकीय आणि सामाजिक हितसंबंध परस्परविरोधी आहेत. यातून अनेक गुंतागुंतीचे प्रश्न तयार झाले आहेत.
नितीश कुमार यांनी गेल्या काही दिवसांपासून केंद्रातल्या मोदी सरकारवर “कटाक्ष” ठेवलेला दिसतो आहे. त्यांचे विश्वासू नेते नितीशकुमार यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी जातीनिहाय जनगणनेचा विषय केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलून एक प्रकारे राजकीय पेच टाकला आहे. शिवाय या विषयाची ते वारंवार आठवण करून देत आहेत. यातून त्यांना संयुक्त जनता दलाचे वेगळे राजकारण साध्य करायचे असल्याचे स्पष्ट होते. बिहारमध्ये जदयूला कमी जागा असताना देखील नितीश कुमार यांना भाजपने मुख्यमंत्रीपदी स्वीकारले. तरी दोन पक्षांमध्ये स्पर्धेचे राजकारण संपलेले नाही हे यातून स्पष्ट होते आहे.
Caste-based Census will help all castes to get their exact numbers, to create policies accordingly. It’s for the benefit of the country
महत्त्वाच्या बातम्या
- आमदार कपिल पाटील, डॉ. गणेश देवी यांचा राष्ट्र सेवा दलात मनमानी कारभार, पदाधिकाऱ्यांचा आरोप ; क्रांती दिनी पुरस्कार केले परत
- बिल्डर अविनाश भोसले यांची आणखी ४ कोटींची संपत्ती जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई
- भुजबळांचा बाप काढला, राष्ट्रवादीला बुडविण्याची भाषा केली, शिवसेना खासदाराच्या १० मिनिटांच्या भाषणाने महाविकास आघाडीत संघर्ष पेटणार
- नारायण राणे कोकणासह मुंबईमध्येही घेणार जन आशीर्वाद सभा; २० ऑगस्टपासून दौरा