भाजपा नेत्यांवर चुकीच्या उद्देशाने लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप करण्याता आला आहे .
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे 13 जुलै रोजी भाजपा नेत्यांनी नितीश कुमार सरकारविरोधात निदर्शने केली. यावेळी भाजपा नेत्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. याप्रकरणी भाजपाने आता न्यायालयात धाव घेतली आहे. Cases have been filed against Nitish Kumar Tejashwi and many officers in the case of lathi charge on BJP leaders
शिक्षण आणि रोजगाराच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये विधानसभेवर मोर्चा काढला होता. पाटणा येथील गांधी मैदानातून हा मोर्चा काढण्यात आला, त्याला पोलिसांनी डाकबंगला क्रॉसिंगवर रोखले होते.
आंदोलनादरम्यान बिहार पोलिसांनी अनेक नेत्यांना ताब्यात घेतले होते. त्याचवेळी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला, वॉटर कॅननचाही वापर करण्यात आला. त्याचवेळी या प्रकरणाबाबत भाजपाने आता न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपाने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात पाटणा दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला आहे. भाजपा नेत्यांवर चुकीच्या उद्देशाने लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. पाटणा दिवाणी न्यायालयात कलम 307, 323, 324, 354-ए आणि 354-डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटणाच्या दिवाणी न्यायालयाशिवाय भाजपा नेते कृष्ण कुमार सिंग कल्लू यांनीही बिहारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यावर 24 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
Cases have been filed against Nitish Kumar Tejashwi and many officers in the case of lathi charge on BJP leaders
महत्वाच्या बातम्या
- भाजपा लखनऊमध्ये घेणार पसमंदा परिषद, मुस्लिमांशी करणार चर्चा
- मणिपूरमध्ये आणखी 2 मुलींवर गँगरेप, दोघांचीही हत्या; जमावासोबत आलेल्या महिलांनीच रेपसाठी दिली चिथावणी
- तिहार तुरुंगातील चार अधिकारी निलंबित, यासीन मलिकच्या हजेरीबाबत निष्काळजीपणाचा आरोप
- पोस्टर्स लावून मुख्यमंत्री होता येत नाही, त्याला 145 आमदार लागतात पण…; हसन मुश्रीफांची टोलेबाजी