• Download App
    Trump tariffs च्या कार्टून स्टोऱ्या, अमेरिकेवरच उलटल्या सगळ्या वजाबाक्या!!

    Trump tariffs च्या कार्टून स्टोऱ्या, अमेरिकेवरच उलटल्या सगळ्या वजाबाक्या!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर येताच चीन, युरोपियन युनियन आणि भारत यांच्या विरोधात टेरिफ वॉर पुकारले आणि आता 90 दिवसांची सवलत देऊन एक पाऊल मागे घेतले, पण या सगळ्या मागे कुठल्याही जागतिक दबावापेक्षा अमेरिकन शेतकरी लॉबी आणि बिझनेस लॉबी यांचाच दबाव वाढल्याने ट्रम्प यांना पाऊल मागे घ्यावे लागल्याचे स्पष्ट झाले.

    ट्रम्प टेरिफ मुळे जगावर काय व्हायचा तो परिणाम झाला, अनेक शेअर बाजार धडाधड कोसळले, पण त्याचवेळी अमेरिकन व्यवसाय, नोकऱ्या धोक्यात आल्या. त्याचबरोबर महागाई प्रचंड वाढण्याचा धोका निर्माण झाला. एवढे होऊनही ट्रम्प यांनी चीन वरचा आपला कटाक्ष दूर केला नाही‌. त्यांनी चीनवर 125 % टेरिफ लावून त्याची अंमलबजावणी सुरू करायची आदेश दिले‌.

    याच दरम्यान ट्रम्प टेरिफ वर जगभरातल्या कार्टूनिस्टनी वेगवेगळी कार्टून्स काढून ट्रम्प यांची पुरती खिल्ली उडवली. या सगळ्या कार्टून्सचा विषय ट्रम्प टेरिफ अमेरिकेवरच उलटल्याचाच दिसला. बहुतेक कार्टूनिस्टनी ट्रम्प यांच्या हातात हातोडा देऊन तो अमेरिकेच्याच टाळक्यात हाणला. काहींनी ट्रम्प इतरांवर टेरिफ बुमरॅंग फेकत आहेत, पण ते उलटून अमेरिकेवरच येऊन पडल्याचे दाखविले. एका कार्टूनिस्टने तर कहर करून ट्रम्प टेबल फॅन समोर लघवी करतायेत आणि ती त्यांच्याच तोंडावर उडते, असे दाखविले. ब्रेक्झिट मुळे ब्रिटनचे जे नुकसान झाले, तेच ट्रम्प टेरिफमुळे अमेरिकेचे होणार असल्याचा दावा या कार्टूनिस्टने केला.

    ट्रम्प हे टेरिफचे ऍटोमिक बटन दाबून अमेरिकेतच महागाई वाढवत असल्याचा दावा दुसऱ्या कार्टून्सिस्टने केला. ट्रम्प यांनी टेरिफचा बाण जगावर सोडला, पण जगाने त्यांच्यापेक्षा जास्त बाण अमेरिकेवर सोडले. त्यामुळे अमेरिकेत बेरोजगारी आणि महागाई वाढेल, असे कार्टून एकाने काढले.

    Cartoonist world over opposed Trump tariffs

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Iran Protests : इराण हिंसाचार- 538 जणांचा मृत्यू, 10 हजार जणांना अटक; इराणने अमेरिका आणि इस्रायलला दिली धमकी

    Pakistani Drones : सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये LoC वर 5 ड्रोन दिसले:दावा- पाकिस्तान घुसखोरीच्या प्रयत्नात; सैन्याचा प्रतिहल्ला, शोधमोहीम सुरू

    Iran : इराणमध्ये आंदोलकांना फाशीची धमकी, सरकारने त्यांना देवाचे शत्रू म्हटले; हिंसेत आतापर्यंत 217 मृत्यू, 2600 हून अधिक ताब्यात