• Download App
    त्रिपुरातील कारबाँग जमातीचे अस्तित्व धोक्यात , लोकसंख्येमध्येही मोठी घट|Carbaung are in dandrous situation in Tripura

    त्रिपुरातील कारबाँग जमातीचे अस्तित्व धोक्यात , लोकसंख्येमध्येही मोठी घट

    विशेष प्रतिनिधी

    आगरतळा – त्रिपुरामधील हालाम समुदायातील उप जमात असलेल्या कारबाँगचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कधीकाळी या जमातीच्या नेत्यांना पाहुणचारासाठी खास शाही राजवाड्याकडून आमंत्रण दिले जात असत. सध्या या जमातीचे केवळ अडीचशे लोक हे सध्या पश्चिंम त्रिपुरा आणि धलाई जिल्ह्यांत वास्तव्यास आहेत.Carbaung are in dandrous situation in Tripura

    विशेष म्हणजे सरकारी पातळीवर देखील या जमातीची उपेक्षाच होताना दिसते. या जमातीतील सर्वांत वयोवृद्ध बिशुराई कारबाँग म्हणाले की,‘‘ दुर्गा पुजेच्या काळामध्ये मी तीन वेळा आगरतळा येथील राजवाड्याला भेट दिली होती. त्यावेळी वीर विक्रम किशोर माणिक्य बहादूर हे महाराज होते.’’

    पश्चििम त्रिपुरा जिल्ह्यातील बारमुरा रांगेत चंपक नगर या आदिवासीबहुल भागात या जमातीचे वास्तव्य आहे. ४० ते ५० कुटुंबे येथे वास्तव्याला आहेत. सध्या या कुटुंबांच्या प्राथमिक गरजा देखील पूर्ण होताना दिसत नाहीत. अन्य दहा ते पंधरा कुटुंबे ही धलाई जिल्ह्यात वास्तव्यास असून या कुटुंबांतील एकूण माणसांची संख्या ही अडीचशेच्या घरात असल्याचे बोलले जाते.

    Carbaung are in dandrous situation in Tripura

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी