Punjab Vikas Party : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. या पक्षाचे नाव पंजाब विकास पार्टी (PVP) असेल. अनेक हिंदी व इंग्रजी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पक्षाच्या घोषणेपूर्वी अमरिंदर यांनी त्यांच्या जवळच्या नेत्यांशी संपर्क साधला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांचे विरोधक या पक्षात सामील होतील. Captain Amarinder Will Form A New Political Party Named Punjab Vikas Party Sources
प्रतिनिधी
चंदिगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग लवकरच नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. या पक्षाचे नाव पंजाब विकास पार्टी (PVP) असेल. अनेक हिंदी व इंग्रजी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पक्षाच्या घोषणेपूर्वी अमरिंदर यांनी त्यांच्या जवळच्या नेत्यांशी संपर्क साधला आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांचे विरोधक या पक्षात सामील होतील.
अमरिंदर यांना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडावी लागली. त्यानंतर ते दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यांनी येथे गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी सांगितले की ते काँग्रेसमध्ये राहणार नाहीत. त्यांनी भाजपमध्ये जाण्यासही नकार दिला होता.
मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर अमरिंदर यांनी नवज्योत सिद्धू यांच्यावर चौफेर टीका केली. कॅप्टन अमरिंदर यांनी नवज्योत सिद्धू यांना कधीही जिंकू देणार नसल्याची प्रतिज्ञाच घेतली आहे. सिद्धूंच्या विरोधात मजबूत उमेदवार उभे करणार, असल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. यामुळे आता कॅप्टन लवकरच एक नवीन पक्ष स्थापन करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
कॅप्टन समर्थक आणि सिद्धूविरोधकांची बांधणार मोट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमरिंदर सध्या आपल्या जवळच्या नेत्यांना भेटून हा पक्षनिर्मितीच्या तयारीला लागले आहेत. यामध्ये मंत्रिमंडळातून बाहेर पडलेल्या जवळच्या मंत्र्यांसह संघटनेतून बाजूला करण्यात आलेले नेते सहभागी होतील. यानंतर सिद्धूंवर नाराज असलेले नेतेही या पक्षात येतील. कॅप्टनच्या या पवित्र्यामुळे त्यांच्या जवळच्या काँग्रेस नेत्यांची तिकिटे कापली जाणार हे निश्चित आहे. यामुळे नवा पक्ष काढून कॅप्टन अमरिंदर पंजाब काँग्रेसला जबर हादरा देण्याची तयारी करत आहेत.
पंजाब सरकार अडचणीत येण्याची शक्यता
कॅप्टन अमरिंदर यांचे हे पाऊल पंजाबच्या काँग्रेस सरकारला अडचणीत आणू शकते. त्यांचे जवळचे आमदार आणि माजी मंत्री काँग्रेस सोडू शकतात. अशा स्थितीत मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचे सरकार अल्ममतात जाण्याची भीती आहे. कॅप्टन अमरिंदर यांनी 2 दिवसांपूर्वीच गृहमंत्री शाह आणि NSA डोवाल यांची भेट घेतली. परतल्यावर त्यांनी पंजाबच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे स्पष्ट केले होते. राष्ट्रीय सुरक्षेबाबत विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या अनुभवावर त्यांनी आधीच चिंता व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्यावर भर
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा हा पक्ष शेतकऱ्यांचे आंदोलन संपवण्यावर भर देणार आहे. असे मानले जाते की, या पक्षाच्या माध्यमातून कॅप्टन कृषी सुधारणा कायद्यांना विरोध करतील. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण पाठिंबा दिलेला होता. पंजाबच्या राजकारणात पुढील निवडणुकीत शेतकऱ्यांचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत कृषी कायद्यांचा तिढा सोडवून कॅप्टन नवीन पक्षातून पंजाबच्या राजकारणावरही वर्चस्व गाजवू शकतात. यासाठी त्यांनी शेतकरी नेत्यांशीही संपर्क साधला आहे.
Captain Amarinder Will Form A New Political Party Named Punjab Vikas Party Sources
महत्त्वाच्या बातम्या
- भारताचे ब्रिटनला जशास तसे उत्तर, प्रवासी ब्रिटिशांसाठी नवे नियम, लस घेतलेली असूनही कोरोना चाचणी आणि क्वारंटाइन बंधनकारक
- शहरे कचरामुक्त करण्याचे ध्येय, पंतप्रधान मोदींकडून ‘स्वच्छ भारत मिशन अर्बन २.०’ आणि ‘अमृत २.०’चा शुभारंभ
- नायडूंचा तरुणांसारखा उत्साह, राजस्थानच्या ऊर्जामंत्री आणि कलेक्टरचा बॅडमिंटनमध्ये केला पराभव
- Cyclone Shaheen : ‘गुलाब’ सरले आता ‘शाहीन’ चक्रीवादळाचा धोका, आज तीव्र होणार, कोणत्या राज्यांना झोडपणार? वाचा सविस्तर…
- अजून निर्णयच नाही, पण माध्यमांची आधीच घाई; टाटा समूहाला एअर इंडियासाठी करावी लागणार प्रतीक्षा, केंद्राने दिले ‘हे’ स्पष्टीकरण