• Download App
    पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष होणार भाजपमध्ये विलीन Captain Amarinder Singh's party will merge with BJP in Punjab

    पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष होणार भाजपमध्ये विलीन; भाजपला संघटनात्मक लाभ मोठा!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : माजी काँग्रेस नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. काँग्रेस मधून बाहेर पडून त्यांनी आपला स्वतंत्र पंजाब लोक काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला होता.
    हा पक्ष आता कॅप्टन अमरिंदर सिंग हे आपला भाजपमध्ये विलीन करण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली असून 19 सप्टेंबरला ते आपल्या पक्षासह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. Captain Amarinder Singh’s party will merge with BJP in Punjab

    कॅप्टन साहेबांचा भाजप प्रवेश निश्चित आहे. परंतु त्याची तारीख अद्याप ठरलेली नाही, असे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले आहे

    पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून काँग्रेस हाय कमांडशी पूर्णपणे बिनसल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून पंजाब लोक काँग्रेस स्थापन केली होती. कॅप्टन साहेबांच्या या पक्षाचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसला. आम आदमी पार्टीने बाकीच्या सर्वच पक्षांचा सुपडा साफ केला. त्यामध्ये काँग्रेस सह अमरिंदर सिंग यांची लोक काँग्रेस देखील वाहून गेली.

    पक्ष भाजपमध्ये विलीन होणार?

    पण आता कॅप्टनसाहेब हे आपली मुलगी जय इंदर कौर, मुलगा रणइंदर कौर आणि नात निर्वाण सिंह यांच्यासह भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीत 19 सप्टेंबरला कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होऊ शकतो. तसेच पंजाबमधील अर्धा डझन माजी आमदारही भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात.

    कॅप्टन सिंह यांचा दारुण पराभव

    कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पत्नी परनीत कौर या मात्र अजूनही काँग्रेसच्या खासदार आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजपसोबत युती करत पंजाब विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. स्वतः त्यांना देखील पटियाला मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला होता.

    भाजपला मोठा संघटनात्मक लाभ

    कॅप्टन साहेब सध्या 80 वर्षांचे आहेत गेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीचे तुमचा पराभव झाला असला तरी त्यांचा राजाकीय ग्राफ नेहमी उंचावरच राहिला आहे. पंजाब मधल्या राजकारणात त्यांचे संदर्भ मूल्य संपलेले नाही शिवाय भाजप संघटनात्मक पातळीवर पंजाब मध्ये अद्याप कमकुवत अवस्थेत आहे भाजप सारखीच अवस्था शिरोमणी अकाली दलाची देखील आहे अशा वेळी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये आपला पक्ष विलीन केल्याने भाजपच्या संघटनात्मक ताकदीला आणखी बळ मिळू शकते. किंबहुना शिरोमणी अकाली दलाची सध्या असलेली विरोधी पक्षाची “पॉलिटिकल स्पेस” भाजप घेऊ शकतो. याचा अर्थ कॅप्टन साहेबांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांच्या स्वतःच्या राजकीय लाभापेक्षा भाजपचा संघटनात्मक पातळीवरचा लाभ अधिक मोठा आहे.

    Captain Amarinder Singh’s party will merge with BJP in Punjab

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य