• Download App
    पक्षाला नामशेष करणाऱ्या नेत्याकडे पंजाबची धुरा, अररिंदरसिंग यांची माकन यांच्यावर टीका|Capt. Amrindar targets Ajay Makan

    पक्षाला नामशेष करणाऱ्या नेत्याकडे पंजाबची धुरा, अमरिंदरसिंग यांची माकन यांच्यावर टीका

    विशेष प्रतिनिधी

    चंडीगड – पंजाब विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवार छाननी समिती प्रमुखपदी अजय माकन यांची नियुक्ती करण्याच्या काँग्रेसच्या निर्णयावर पंजाब लोक काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.Capt. Amrindar targets Ajay Makan

    ते म्हणाले की, दिल्लीतील १९८४च्या शीखविरोधी दंगलीतील आरोपी ललित माकन यांचे अजय हे पुतणे आहेत. या पदासाठी काँग्रेसला याहून वाईट व्यक्ती मिळू शकली नसतील. एकीकडे केंद्र सरकार एक दोषी सज्जन कुमार याच्यावर कारवाई करण्याच्या मार्गावर आहे,



    तर दुसरीकडे काँग्रेस माकन परिवाराचा ते सुद्धा पंजाबमध्ये सन्मान करीत आहे. हे म्हणजे पंजाबी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. अंबिका सोनी, सुनील जाखड अशा अनुभवी नेत्यांच्या समितीचे नेतृत्व करण्यास एरवी सुद्धा माकन अपात्रच होते.

    अमरिंदर यांनी पुढे सांगितले की, माकन यांची निवडणुकीशी संबंधित कामगिरी सुद्धा प्रश्न निर्माण करणारी आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा ते पराभवाचे धनी झाले. दिल्लीत पक्षाला जवळपास नामशेष केलेल्या व्यक्तीकडे पंजाबची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळे पंजाबात काँग्रेसचे भवितव्य काय असेल हे स्पष्ट होते.

    Capt. Amrindar targets Ajay Makan

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Ganga Expressway : हवाई दलाने रचला विक्रम : गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचे रात्रीचे लँडिंग

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??

    Pahalgam attack : पहलगाम हल्ला : पाक संरक्षणमंत्र्यांकडून धमकी- भारताने पाणी थांबवल्यास हल्ला करू