• Download App
    केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; हेल्थ कार्ड स्वाइप करून देशातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार!! CAPF jawans can avail treatment in any hospital in India by swiping card, announced Amit shah%

    केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; हेल्थ कार्ड स्वाइप करून देशातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार!!

    वृत्तसंस्था

    जैसलमेर : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी केंद्रातील मोदी सरकारने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला असून देशभरातील कोणत्याही हॉस्पिटल मध्ये केवळ हेल्थ कार्ड स्वाइप करून त्यांना उपचाराचा लाभ घेता येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ही माहिती दिली.

    अमित शहा आज राजस्थानच्या जैसलमेर मध्ये आहेत. त्यांनी तिथे रोहिताश बॉर्डर पोस्टला भेट देऊन निरीक्षण केले. सीमेवरची सुरक्षा व्यवस्था आणि तिथल्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. त्याचबरोबर तेथील केंद्रीय पोलीस दलाच्या जवानांची संवाद साधला. यावेळी अमित शहा म्हणाले, की केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल दलातील जवानांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांना हेल्थ कार्ड देण्यात येईल हे कार्ड देशभरात कुठेही स्वाईप केले तर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही हॉस्पिटल मध्ये उपचारांचा लाभ घेता येईल.

    देशभरात केंद्रीय सशस्त्र राखीव दलाची पोलिसांची संख्या दीड लाखाच्या आसपास आहे. यामध्ये 132 बटालियन अस्तित्वात आहेत. यातल्या काही बटालियन राखीव आहेत. या दीड लाख जवानांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना या हेल्थ कार्डचा उपयोग करून घेऊन देशभरात कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.

    आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनमध्ये भारतीय सैन्यदलांसाठी पायाभूत सुविधा कोणत्याही स्थितीत कमी पडणार नाहीत, अशी घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलासंदर्भात मोदी सरकारने घेतलेला निर्णय स्पष्ट करून सांगितला आहे.

    CAPF jawans can avail treatment in any hospital in India by swiping card, announced Amit shah

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!

    Iqbal Singh : भाजपचे इक्बाल सिंग दिल्लीचे नवे महापौर होणार; ‘आप’ निवडणुकीपासून दूर

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये ढगफुटी, श्रीनगर महामार्ग 20 फूट चिखल, शेकडो वाहने अडकली