• Download App
    गुमनामी बाबा की नेताजी? : गुमनामी बाबांचा DNA रिपोर्ट सार्वजनिक करायला केंद्रीय फॉरेन्सिक लॅबचा नकारCan’t share Gumnami Baba’s DNA report

    गुमनामी बाबा की नेताजी? : गुमनामी बाबांचा DNA रिपोर्ट सार्वजनिक करायला केंद्रीय फॉरेन्सिक लॅबचा नकार

    वृत्तसंस्था

    कोलकाता : गुमनामी बाबांच्या अस्थी आणि अन्य अवशेषांचा DNA चाचणीचा रिपोर्ट electropherogram सार्वजनिक रित्या जाहीर करायला कोलकत्याच्या केंद्रीय फॉरेनसिक लॅबोरेटरीने (CFSL) नकार दिला आहे. गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते, असे एक महत्त्वाचे संशोधन कागदपत्रांच्या आधारे झाले आहे. त्याला पुष्टी देण्यासाठी गुमनामी बाबांची बाबांच्या अस्थी आणि अवशेषांची डीएनए टेस्ट करणे जरूरीचे होते. ती टेस्ट केली आहे.  Can’t share Gumnami Baba’s DNA report

    पण तिचे रिपोर्ट कोलकात्याच्या केंद्रीय फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे आहेत. परंतु ते सार्वजनिक करायला तेथील अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. संबंधित रिपोर्ट सार्वजनिक रित्या जाहीर केले तर त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न होईल, असा दावा त्यामध्ये केला आहे.

    माहितीच्या अधिकारांतर्गत सायक सेन नामक व्यक्तीने गुमनामी बाबांचा डीएनए रिपोर्ट सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती. असा रिपोर्ट आपल्याकडे आहे. परंतु तो सार्वजनिक रित्या जाहीर करणे देशाचा सुरक्षेला धोका उत्पन्न करू शकतो, असे कारण सांगून CFSL अर्थात केंद्रीय फॉरेन्सिक लॅबोरेटरीने रिपोर्ट सार्वजनिक करायला नकार दिला आहे.

    – कोण होते गुमनामी बाबा?

    गुमनामी बाबा हे फैजाबाद मध्ये गुप्तपणे राहत होते. ते निवडक लोकांनाच भेटत असत त्यावेळी काही लोकांनी त्यांच्या निधनानंतर म्हणजे 1985 नंतर काही वेळा सार्वजनिक रित्या मुलाखती देऊन गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाष चंद्र बोस होते, याचा निर्वाळा दिला आहे.

    1985 मध्ये गुनामी बाबांचे निधन झाले.

    गुमनामी बाबांच्या निधनानंतर केंद्र सरकारने नेमलेल्या मुखर्जी कमिशनने देखील गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते की नव्हते, या विषयी स्पष्ट खुलासा करू शकले नाही.

    मात्र त्यानंतरच्या काही संशोधनांमध्ये गुमनामी बाबा हेच नेताजी सुभाषचंद्र बोस असल्याचा ठाम निष्कर्ष काही संशोधकांनी काढला आहे. अर्थात डीएनए रिपोर्ट सार्वजनिक नसल्याने त्यावर कोणीही खात्रीशीर रित्या काहीही सांगू शकलेले नाही. मात्र, माहितीच्या अधिकारात सहायक सेन यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कोलकात्याच्या केंद्रीय फॉरेन फॉरेनसिक लॅबरोटरीने आपल्याकडे गुन्नामी बाबांचा डीएनए रिपोर्ट असल्याचे मान्य केले आहे. परंतु राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तवतो जाहीर करता येणार नाही असे उत्तर दिले आहे.

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!