• Download App
    कॅनडातील शीख समुदायाचा खलिस्तानी चळवळीला बिलकुल पाठिंबा नाही; कॅनडाचे खासदार चंद्र आर्य यांचे ट्विट Canada and the president of Sikhs for Justice which organizes the so-called referendum

    कॅनडातील शीख समुदायाचा खलिस्तानी चळवळीला बिलकुल पाठिंबा नाही; कॅनडाचे खासदार चंद्र आर्य यांचे ट्विट

    वृत्तसंस्था

    टोरंटो : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या बेताल वक्तव्यानंतर खलिस्तानी चळवळीने पुन्हा एकदा उचल खाल्ल्यानंतर खलिस्तानी चळवळीचा म्होरक्या गुरुपतवंत सिंग पन्नू याने हिंदू कॅनडियन लोकांना कॅनडा सोडून जाण्याच्या धमक्या दिल्या. या पार्श्वभूमीवर कॅनडातील संसदेचे खासदार चंद्र आर्य यांनी हिंदू कॅनडियन समुदायाला निर्भय राहण्याचे आवाहन केले आहे. कॅनडातील शीख समुदायाचा खलिस्तानी चळवळीला बिलकुल पाठिंबा नसल्याचा निर्वाळा त्यांनी एका ट्विट द्वारे दिला आहे. Canada and the president of Sikhs for Justice which organizes the so-called referendum

    त्यांनी आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे तो असा :

    काही दिवसांपूर्वी कॅनडातील खलिस्तान चळवळीचे नेते आणि तथाकथित सार्वमताचे आयोजन करणाऱ्या शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंग पन्नून याने हिंदू-कॅनडियन लोकांना कॅनडा सोडून भारतात परत जाण्यास सांगून हल्ला केला. त्याने हिंदू कॅनेडियन समुदायाला टार्गेट केल्याने ते भयभीत झाले आहेत. पण मी हिंदू-कॅनडियन लोकांना शांत पण सतर्क राहण्याचे आवाहन करतो.

    खलिस्तान चळवळीचा म्होरक्या गुरुपतसिंग पन्नू कॅनडातील हिंदू आणि शीख समुदायांमध्ये फूट पाडण्यासाठी हिंदू-कॅनडियनांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आमचे बहुसंख्य कॅनेडियन शीख बंधू आणि भगिनी खलिस्तान चळवळीचे बिलकूल समर्थन करत नाहीत. बहुतेक शीख कॅनेडियन नागरिक कॅनडात राहून अनेक कारणांमुळे खलिस्तान चळवळीचा जाहीर निषेध करू शकत नाहीत, परंतु ते हिंदू-कॅनेडियन समुदायाशी घट्ट नात्याने जोडलेले आहेत. ही एकजूट कॅनडियन हिंदू शीख समुदायाने तुटू देऊ नये.

    पण भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवादाची मखलाशी करणे किंवा धार्मिक गटाला लक्ष्य करणाऱ्या द्वेषपूर्ण गुन्ह्याला परवानगी कशी दिली जाते, हे समजत नाही, या स्पष्ट शब्दांमध्ये चंद्र आर्य यांनी कॅनडियन सरकारचे वाभाडे काढले.

    कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी शीख दहशतवाद्यांच्या हत्येबद्दल भारत सरकारला दोषी धरल्यानंतर तिथे खलिस्ताने चळवळीने पुन्हा उचल खाल्ली त्यानंतरच गुरुपतसिंग पन्नू याची हिंदू कॅनडियन समुदायाला धमक्या देण्याची हिंमत वाढली पण कॅनडातल्या भारतीय वंशाच्या खासदारांनी मात्र गुरुपतला शह दिला आहे.

    Canada and the president of Sikhs for Justice which organizes the so-called referendum

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे