Sunday, 4 May 2025
  • Download App
    शिवकुमार की सिद्धरामय्या?? : बहुमत मिळूनही मुख्यमंत्री ठरेना; पराभवातून सावरत भाजप नेत्यांचे काँग्रेसवर शरसंधान Can Siddaramaiah deny role in Cong-JD(S) govt's collapse? asks Sudhakar who defected to BJP

    शिवकुमार की सिद्धरामय्या?? : बहुमत मिळूनही मुख्यमंत्री ठरेना; पराभवातून सावरत भाजप नेत्यांचे काँग्रेसवर शरसंधान

    वृत्तसंस्था

    बेंगलोर : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवून देखील काँग्रेसला मुख्यमंत्री पदाचा अद्याप निर्णय करता येत नाही. या मुद्द्यावरून आता पराभवाच्या धक्क्यातून बाहेर येत भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार शरसंधान साधले आहे. Can Siddaramaiah deny role in Cong-JD(S) govt’s collapse? asks Sudhakar who defected to BJP

    जनतेने एवढा मोठा कौल देऊ नाही काँग्रेसला कर्नाटकचे मुख्यमंत्री ठरवता येत नाहीत यावरून पक्ष संघटनेत किती बजबजपुरी माजली आहे हेच सिद्ध होते, असा टोला माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हाणला आहे, तर सिद्धरामय्या आज जरी काँग्रेस श्रेष्ठींकडे मुख्यमंत्री पद मागत असले तरी काँग्रेस – जेडीएस सरकार पाडण्यात त्यांचाच हात होता हे ते नाकारू शकतील का??, असा खोचक सहभाग काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेले नेते सुधाकर यांनी केला आहे.

    एचडी कुमार स्वामी यांच्या नेतृत्वाखालचे काँग्रेस जीडीएस आघाडीचे सरकार सिद्धरामय्या यांनी पुढाकार घेऊन पाडले होते याचा संदर्भ सुधाकर यांनी दिला आहे.

    बोम्मई आणि सुधाकर या दोन्ही नेत्यांनी काँग्रेस मधल्या तीव्र मतभेदांवर बोट ठेवले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर त्या पक्षाचे नेते गेले तीन दिवस गप्प बसले होते. पण आता काँग्रेस मधील मतभेद अजूनही मिटत नाहीत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला टोचायला सुरुवात केली आहे. यातूनच बसवराज बोम्मई आणि सुधाकर यांची वक्तव्य समोर आली आहेत.

    Can Siddaramaiah deny role in Cong-JD(S) govt’s collapse? asks Sudhakar who defected to BJP

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू

    Igla S missile : भारतीय लष्कराला रशियन बनावटीचे इग्ला-एस क्षेपणास्त्र मिळाले

    Manoj Tiwari : मनोज तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला!