प्रतिनिधी
नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. दिग्विजय सिंह सध्या राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत आहेत. त्यांना अचानक दिल्लीला बोलावण्यात आले आहे. रात्री ते दिल्लीला पोहोचतील. दिग्विजय सिंह उद्या काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संदर्भात त्यांनी आधीच संकेत दिले होते. राजस्थानमधील राजकीय उलथापालथीनंतर त्यांचे नाव समोर आले आहे. त्याचवेळी कमलनाथ यांनीही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचे जाहीर केले.Calling Digvijay Singh from Delhi Chances of candidacy for Congress President strengthened
दुसरीकडे कमलनाथ बुधवारी भोपाळच्या पीसीसी (राज्य काँग्रेस कमिटी) कार्यालयात म्हणाले की, दिग्विजय सिंह अध्यक्ष होण्याच्या प्रश्नावर- त्यांनाच विचारा. महिनाभरापूर्वी राहुल गांधींशी बोललो. त्यांनाच अध्यक्ष होण्याबाबत बोललो मात्र, त्यांनी नकार दिला. शशी थरूर माझ्याशी बोलले. निवडणूक असल्यानेच फॉर्म भरणार असल्याचे थरूर म्हणाले होते. निवडणुका होताना दिसत नाहीत.
दिल्लीत सोनियांशी काय चर्चा झाली?
सोनिया गांधी यांनी कमलनाथ यांना दिल्लीत बोलावले होते. कमलनाथ यांनी सांगितले की, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीला 12 महिने बाकी आहेत. ते राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेऊ शकत नाहीत, कारण मध्य प्रदेश वरुन माझे लक्ष विचलीत होईल. आता गुजरातमध्ये निवडणूक आहे, त्यानंतर हिमाचलमध्ये निवडणुका होतील, मी प्रत्येक राज्यासाठी निवडणूक रणनीती तयार करू शकत नाही. सध्या माझे संपूर्ण लक्ष मध्यप्रदेशवर आहे. मला अध्यक्ष होण्यात फारसा रसही नाही. यावेळी मध्य प्रदेशवरुन मला माझे लक्ष हटवायचे नाही.
गेहलोत यांनी चूक केली असे का म्हटले?
काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने गेहलोत छावणीतील दोन मंत्र्यांसह तिघांना नोटीस पाठवली असून अनुशासन भंग केल्याबद्दल 10 दिवसांत उत्तर मागितले आहे. यामध्ये महेश जोशी, शांती धारिवाल आणि आमदार धर्मेंद्र राठोड यांचा समावेश आहे. राजस्थानमधील या घडामोडीवर कमलनाथ म्हणाले की, अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा झाली आहे. गेहलोत आणि इतरांचे वर्तन योग्य नव्हते, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र, अशोक गेहलोत यांचे म्हणणे आहे की, तसे कोणतेही काम केलेले नाही.
पायलट आणि गेहलोत यांचे गटबाजीवरही भाष्य
राजस्थान काँग्रेसमधील अनुशासनहीनतेवर कमलनाथ म्हणाले की, सचिन पायलट यांनी काहीही केलेले नाही, मीडियातही काही बोलले नाही. काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्वाला पुढे येण्यापासून रोखण्याच्या आरोपांवर ते म्हणाले – भाजपला विचारा, पंतप्रधान 70 वर्षांचे झाले आहेत. नड्डा यांना दुसऱ्यांदा निवडणुकीशिवाय अध्यक्ष बनवण्यात आले. पायलट आणि गेहलोत दोघेही माझे मित्र आहेत, मला या गटबाजीत पडायचे नाही कारण माझ्याकडे वेळ नाही. भारत जोडो यात्रेचा राजस्थानातील घडामोडींशी काहीही संबंध नाही. भारत जोडो यात्रा खूप यशस्वी झाली आहे आणि यापुढेही यशस्वी होईल.
जाणून घ्या राजस्थानचा राजकीय वाद काय आहे?
सीएम अशोक गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी नामांकन करण्यापूर्वी रविवारी नवीन मुख्यमंत्र्यांबाबत बैठक बोलावण्यात आली होती. अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे हे ओपिनियन पोलसाठी निरीक्षक म्हणून आले होते, पण बैठक झाली नाही. निरीक्षकांच्या बैठकीपूर्वीच आमदार UDH मंत्री शांती धारीवाल यांच्या घरी आमदार एकत्र आले. काही निर्णय होण्यापूर्वीच राजस्थान काँग्रेसच्या 70 हून अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्ष डॉ. सीपी जोशी यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले.
Calling Digvijay Singh from Delhi Chances of candidacy for Congress President strengthened
महत्वाच्या बातम्या
- PFI ला टेरर फंडिंग : 6 अरब देशांमधील 500 + बँक खाती एनआयएच्या रडारवर!!
- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : महागाई भत्त्यात थेट 4% वाढ, दिवाळीपूर्वी 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ
- लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) होणार नवीन CDS : देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ; जनरल रावत यांच्या निधनानंतर रिक्त होते पद
- Blast in Jammu: बॉम्बस्फोटांनी हादरले उधमपूर, 8 तासांत दुसरा स्फोट, दहशतवादी कृत्याचा संशय