ZyCoV-D : देशात कोरोना लसीचा तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाची गती मंदावलेली आहे. परंतु लवकरच यावर दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अहमदाबादेतील औषध निर्मिती कंपनी कॅडिला हेल्थकेअर लवकरच आपल्या कोरोना लसीचे उत्पादन तिप्पट करणार असून दरमहा 3 कोटी डोस निर्मिती करणार आहे. Cadila Soon Tripple the manufacturing Of Its Corona Vaccine ZyCoV-D
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात कोरोना लसीचा तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाची गती मंदावलेली आहे. परंतु लवकरच यावर दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अहमदाबादेतील औषध निर्मिती कंपनी कॅडिला हेल्थकेअर लवकरच आपल्या कोरोना लसीचे उत्पादन तिप्पट करणार असून दरमहा 3 कोटी डोस निर्मिती करणार आहे.
कॅडिला हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या म्हणण्यानुसार, कंपनी आपली लस ZyCoV-D चे उत्पादन दरमहा 3 कोटी डोसपर्यंत नेणार आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल म्हणाले, कंपनी आपली लस ZyCoV-D चे मासिक उत्पादन पुढील 4 ते 5 महिन्यांत 3 कोटी डोसपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. सध्या, ZyCoV-Dचे मासिक उत्पादन 1 कोटी डोस आहे. याव्यतिरिक्त ते अंतर्गत क्षमता वाढीसाठी थर्ड पार्टी उत्पादकांचीही मदत घेत आहेत. कंपनीला आशा आहे की, मे महिन्यातच ZyCoV-Dच्या आपत्कालीन वापरासाठी डीजीसीआयला अर्ज देऊ.”
लसीचे अखेरचे ट्रायल सुरू
ZyCoV-D ही डीएनए प्लाझ्मिड लस आहे. या लसीची अखेरची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. ही लस तीन डोसमध्ये दिली जाईल. तथापि, कंपनी आपल्या लसीच्या दोन डोसच्या पर्यायावरही काम करत आहे. सुमारे 30,000 प्रौढांवर याची चाचणी घेण्यात येत आहे. गेल्या महिन्यातच डीसीजीआयने कोरोनाव्हायरस साथीच्या रुग्णांच्या उपचारासाठी झाइडस कॅडिलाच्या व्हेराफिन औषधाच्या वापरास मान्यता दिली होती.
Cadila Soon Tripple the manufacturing Of Its Corona Vaccine ZyCoV-D
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या उत्पत्तीवरून अमेरिकेने चीनला फटकारले, व्हाइट हाऊसचे शास्त्रज्ञ म्हणाले- चीनचा खरा चेहरा समोर आणणे गरजेचे!
- इंडियन मेडिकल असोसिएशनचा रामदेव बाबांविरुद्ध १००० कोटींचा मानहानीचा दावा, म्हणाले- लेखी माफी मागा!
- सलमान खानचा केआरकेविरुद्ध मानहानीचा खटला, राधेच्या निगेटिव्ह रिव्ह्यूमुळे भडकला ‘सुलतान’
- पंतप्रधान मोदींचे वेसाक ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये बीजभाषण, जगभरातील बौद्ध संघ प्रमुखांशी व्हर्च्युअली संवाद
- 7 Years Of Modi Government : पीएम मोदींच्या ७ वर्षांच्या सत्तेतील देशात आमूलाग्र बदल करणारे ७ महत्त्वाचे निर्णय