• Download App
    किरण रिजीजू यांना कायदे मंत्रालयातून हटविले; अर्जुन राम मेघवाल नवे कायदे राज्यमंत्री; रिजीजूंकडे भूविज्ञान मंत्रालयाचा कार्यभार|Cabinet reshuffle: Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as Union Law Minister

    किरण रिजीजू यांना कायदे मंत्रालयातून हटविले; अर्जुन राम मेघवाल नवे कायदे राज्यमंत्री; रिजीजूंकडे भूविज्ञान मंत्रालयाचा कार्यभार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात एक महत्त्वपूर्ण बदल केला असून विद्यमान कायदेमंत्री किरण रिजीजू यांना कायदे मंत्रालयातून बाजूला करून त्यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाचा कार्यभार सोपविला आहे, तर रिजीजू यांच्याकडील कायदे मंत्रालयाचा कार्यभार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपविला आहे. राष्ट्रपती भवनातून या संदर्भात पत्रक जारी करण्यात आले.Cabinet reshuffle: Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as Union Law Minister



    केंद्रीय मंत्रिमंडळात अरुणाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करत असलेले किरण रिजीजू पंतप्रधान मोदींचे विश्वासू सहकारी मानले जातात पण त्यांच्यात आणि न्यायव्यवस्था यांच्यात गेल्या काही दिवसात फार सौहार्द पूर्ण संबंध राहिले नव्हते. न्यायाधीशांची कॉलेजियम पद्धतीची निवड, प्रलंबित असलेले खटले याविषयी किरण रिजीजू यांनी काही परखड मते व्यक्त केली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर किरण रिजीजू यांच्या खाते बदलाकडे राजकीय वर्तुळात पाहिले जात आहे.

    Cabinet reshuffle: Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as Union Law Minister

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका