वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अन्न हे पूर्णब्रह्म या भारतीय संस्कृतीला अनुसरून केंद्रातील मोदी सरकारने तब्बल 1 लाख कोटी रुपयांच्या अन्न भांडार योजनेला मंजुरी दिली आहे. जगातली ही सर्वात मोठी अन्न भांडार योजना असून आजच्या कॅबिनेटमध्ये या योजनेला सरकारने मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.Cabinet nod to Inter-Ministerial Committee for facilitating world’s largest grain storage plan in cooperative sector
देशात सध्या 1450 लाख टन धान्य साठवण्याची क्षमता असून त्यामध्ये 700 लाख भर घालून एकूण 2150 लाख टन धान्य साठवणूक क्षमता करण्याची ही योजना आहे. यामध्ये प्रत्येक प्रखंडात 2000 टन धान्य साठवण्याची गोदामे बांधण्यात येतील. यातील 700 लाख टन धान्य सहकारिता क्षेत्रांतर्गत बांधण्यात येणाऱ्या गोदामांमध्ये साठविले जाईल.
देशातील अन्नसुरक्षा योजनेला मजबुती देण्यासाठी तसेच शेतकऱ्याने घामातून पिकवलेले अन्नधान्य अजिबात वाया जाऊ नये यासाठी योजना अत्यंत महत्त्वाची आहे.
येत्या पाच वर्षात देशातल्या अन्न साठवणूक क्षमतेची क्षमता 2,150 लाख टन केली जाईल.
योजनेचा हा आहे हेतू
- अन्नधान्य वाया जाऊ नये यासाठी साठवणूक क्षमता वाढविणे.
- संकटकाळात शेतकऱ्याला आपले धान्य कमी भावात विकावे लागू नये
- अन्नधान्याची आयात मर्यादित करणे
- गाव आणि तालुका पातळीवर रोजगार निर्मिती
- यातून केंद्राची अन्नसुरक्षा योजना मजबूत राहील.
- देशात शेतकरी 312 धान्य पिकवतो. त्यातले फक्त 47% धान्य साठवणूक क्षमता सध्या देशात उपलब्ध आहे. ती वाढवण्याची अन्न भांडार योजना आहे.
Cabinet nod to Inter-Ministerial Committee for facilitating world’s largest grain storage plan in cooperative sector
महत्वाच्या बातम्या
- कुस्तीगीरांचे फक्त दावे, ब्रजभूषण सिंहांच्या विरोधात पुरावेच नाहीत; दिल्ली पोलिसांची माहिती
- तब्बल 53 वर्षांनी निळवंडे धरणाचे पाणी शेतातून खळाळणार!!; शिंदे – फडणवीसांच्या हस्ते चाचणी शुभारंभ
- मान्सूनचा वाढला वेग, उद्या केरळमध्ये पोहोचणार; 15 जूनपासून देशातील बहुतांश भागांत पावसाची शक्यता
- संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात दावा : सध्याचे संकट काहीच नाही, पाकिस्तानात पुढच्या काही महिन्यांत अन्नाचे दुर्भिक्ष्य आणखी वाढेल