मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी 15 डिसेंबर पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती.
विशेष प्रतिनिधी
जयपूर : राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्तारावरील सस्पेंस आता संपुष्टात आला आहे. 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी 15 डिसेंबर रोजी दोन उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि प्रेम चंद्र बैरवा यांच्यासह पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सातत्याने चर्चा होत होती. अखेर राजस्थानमध्ये आज 30 डिसेंबर रोजी भजनलाल सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.Cabinet expansion of Bhajanlal government in Rajasthan today
राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. मंत्र्यांच्या शपथविधीसाठी दिलेली कार्डही बाहेर आली आहेत. ज्यामध्ये 30 डिसेंबर रोजी राजभवनात दुपारी 3.15 वाजता शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी शुक्रवारी मंत्रीमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा तिसऱ्यांदा दिल्लीला रवाना झाले होते.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता विशेष विमानाने दिल्लीला रवाना झाले होते. जिथे त्यांनी मंत्रिमंडळ स्थापनेबाबत पक्षाच्या हायकमांडशी चर्चा केल्याची माहिती आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये मंत्रीमंडळ स्थापनेपूर्वी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी काल राज्यपाल कलराज मिश्रा यांचीही भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शर्मा आपल्या मंत्र्यांची यादी राज्यपालांना सादर केली आणि त्यानंतर संध्याकाळी दिल्लीला रवाना झाले.
Cabinet expansion of Bhajanlal government in Rajasthan today
महत्वाच्या बातम्या
- अखेर 4 महिन्यांनी चीनने नियुक्त केले नवे संरक्षणमंत्री, नौदल प्रमुखांना दिली जबाबदारी
- ULFA आणि केंद्र सरकारमध्ये शांतता करार; 700 कार्यकर्त्यांनी केले आत्मसमर्पण, 12 वर्षांच्या चर्चेचा परिणाम
- रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सोनिया-खरगेंना निमंत्रण, पण हजेरी निश्चित नाही; जयराम रमेश म्हणाले- योग्य वेळी पक्ष निर्णय घेईल
- नितीश कुमार JDUचे अध्यक्ष; पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत निर्णय; ललन सिंह यांचा राजीनामा